AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकदम डोक्यात गेला; भांडणं करणाऱ्या पतीला तिने छतावरून धक्का दिला, व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

Husband Wife Fight Video : समाज माध्यमांवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पती आणि पत्नी दरम्यान एका मुद्यावरून भांडण होते. पतीचा हा कारनामा पत्नीला आवडत नाही आणि ती त्याला छतारून धक्का देते. हा व्हिडिओ पाहून तुमच्या काळजात सुद्धा धस्स होईल.

एकदम डोक्यात गेला; भांडणं करणाऱ्या पतीला तिने छतावरून धक्का दिला, व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा
पती-पत्नीचे भांडण, व्हिडिओ व्हायरलImage Credit source: गुगल
| Updated on: Apr 13, 2025 | 4:35 PM
Share

समाज माध्यमांवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील दृश्य तुम्हाला विचलित करतील. व्हिडिओमध्ये पती-पत्नी एका घराच्या छतावर दिसत आहे. सुरुवातीला पत्नी मोबाईलमधून त्याचे व्हिडिओ शूट करताना दिसते. तर पती तिच्यासोबत भांडण उकरून काढतान दिसतो. या दोघांमध्ये भांडण होते. त्यानंतर पत्नी रागाच्या भरात पतीला छतावरून धक्का देते. ही दृश्य अनेकांना घाम फोडू शकतात. ही घटना खाली उभ्या असलेल्या कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केली आहे. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे.

काय आहे व्हिडिओत?

Video मध्ये एका कच्चा घराच्या छतावर एक पुरूष आणि एक महिला उभे असलेले दिसतात. तर महिलेच्या हातात मोबाईल आहे. तेवढ्यात हा पुरूष त्या महिलेवर रागावतो. ती महिला सुद्धा त्याला काही तरी उत्तर देते. दोघांमध्ये अगदी थोड्याच वेळात भांडणाचा पार चढतो. ही महिला रागाच्या भरात त्या पुरुषाला घराच्या छतावरून धक्का देते. तो थेट खालच्या लाकडी छतावरून जमिनीवर कोसळतो. ही घटना घडत असताना कुणीतरी व्यक्ती खालून हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करते. घराच्या छतावरून समोर असलेल्या अंगणात ही व्यक्ती धपकन पडते. ही घटना पाहून अनेकांना धक्का बसतो. खाली पडल्यावर ही व्यक्ती विव्हळताना दिसते. या व्यक्तीला उठणे ही अवघड झाल्याचे दिसते. त्या व्यक्तीला किती मार लागला हे काही व्हिडिओत स्पष्ट झाले नाही.

&

अनेक प्रतिक्रिया

सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोक हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे म्हणत आहे. त्यांना हा सर्व प्रसिद्धी केलेले नाटक वाटत आहे. तर काही लोकांनी याला पती-पत्नीमध्ये मोबाईलच्या कारणामुळे नातेसंबंध दुरावत असल्याचे म्हटले आहे. या घटनेने समाजात पती-पत्नीमधील नाते कमकुवत होत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. नात्यातील विश्वास आणि संवाद हरवत चालल्याची प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. हा व्हिडिओ एक्स या समाज माध्यमावर @rareindianclips नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.