कामानिमित्त बायको गेली दुसर्या शहरात, परतल्यावर गळ्यावर दिसले विचित्र खूण, ते पाहून नवराच झाला बेशुद्ध!
Suspicious Hickey on wife : पत्नी कामानिमित्त ऑफिस दूरवर दुसऱ्या शहरात गेली होती. इकडे पती आणि त्यांची लहान मुलगी घरी थांबले. पत्नी परत आल्यावर तिच्या गळ्यावर पतीला वेगळेच व्रण दिसले. हे निशाण पाहून त्याला धडकीच भरली.

कार्यालयीन कामानिमित्त अनेकांना दुसर्या शहरातच काय, दुसर्या देशात सुद्धा जावे लागते. काही नोकरीच तशाच असतात. त्याला काही पर्याय नसतो. त्यातच काही कार्यालये दुसर्या शहरात बैठक ठेवतात. त्या ठिकाणी कर्मचार्यांसाठी फिरण्याची, हॉटेलिंग ट्रीट देण्यात येते. तेवढीच हवापालट होत असल्याने कर्मचारी त्याला नकार देऊ शकत नाही. तर ही या महिलेला दुसऱ्या शहरात कामासाठी जाण्याची संधी होती. अर्थात तिने जावेच अशी काही सक्ती नव्हती. पण ही महिला कार्यालयीन टूरवर एक हप्ता दूरच्या शहरात गेली. परतल्यावर मात्र पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. पत्नीच्या गळ्यावरील ती खूण या भांडणाला कारणीभूत ठरली.
मुलीचा वाढदिवस, पत्नी टूरवर
तर पत्नीने कार्यालयीन कामासाठी एक आठवडा बाहेर जाणार असल्याचे सांगितले. पतीने, मुलीचा वाढदिवस असल्याने हा टूर रद्द करण्यास सांगितले. पण पत्नीने हा टूर रद्द करता येत नसल्याचे सांगितले. पत्नी अमेरिकेतली वेगास या शहरात कार्यालयीन कामासाठी गेली. पतीने काम असल्याने तिला थांबवले नाही. पण या दरम्यान मुलीला आईची आठवण यायची. पती ज्यावेळी तिला कॉल करायचा, ती मिटींग, चर्चा वा इतर काही कारण सांगून फोन कट करायची. बोलली तरी तुटक बोलायची.




पत्नीने मुलीच्या वाढदिवशी व्हिडिओ कॉल करण्याचे मान्य केले. पतीने पण ती कामात असल्याने त्रास न देण्याचे ठरवले. पतीला पत्नी कामात व्यस्त असल्याचे वाटत होते. पण वाढदिवसाच्या दिवशी तिने एकही फोन केला नाही की फोन उचलला नाही. व्हिडिओ कॉल सुद्धा तिने स्वीकारला नाही. आज दिवसभर विविध मिटिंग आणि इतर सहकर्मचारी असल्याने व्हिडिओ कॉल करू शकले नाही, असा रात्री तिने मॅसेज टाकला. पण पतीला ही बाब थोडी विचित्र वाटली. कारण गेल्या सहा वर्षात असे कधी घडले नव्हते. दोघांचा प्रेमविवाह झाला होता. पत्नी एक वर्षाने मोठी होती. त्यांना गोड मुलगी होती. पत्नी हल्ली तुटक वागत असल्याचे त्याला जाणवत होते. पण कामाच्या दडपणामुळे असेल म्हणून त्याने तिला कधी तसे विचारले नाही. पण ती दुसऱ्या शहरात गेल्यापासूनचे तिचे वागणेच त्याला खटकत होते.
पत्नी सोशल मीडियावर सक्रिय
त्या संपूर्ण आठवड्यात पत्नी सोशल मीडियावर सक्रिय होती. तिने दुसऱ्या शहरातील कार्यालय, राहण्याचे ठिकाण, रात्रीच्या पार्टी, तिचे सहकारी यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. त्यात एक तरुण प्रत्येक फोटोत दिसत होता. त्याने काही फोटोत पत्नीच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढले होते. ही बाब पतीला थोडी खटकली.
जेव्हा पत्नी परत आली. तेव्हा पतीने तिच्या गळ्यावर एक विचित्र खूण पाहिली. हा कसला व्रण आहे हे त्याला काही कळेना. त्याने तिला याविषयी विचारल्यावर एक किडा रगडल्याचे तिने सांगितले. पण ही खूण थोडी विचित्र का वाटत आहे, हे पतीला काही कळेना. दोन दिवसानंतर तो एक मालिका पाहत असताना, त्याला त्यात एक पती पत्नीला लव्ह बाईट करतो हे दृश्य दिसले. हा लव्ह बाईट सेम टू सेम पत्नीच्या गळ्यावर असल्याचे त्याला जाणवले. त्याने पत्नीला या खूण विषयी पुन्हा विचारल्यावर ती चिडली. त्याने मनातील शंका व्यक्त केल्यावर ती रागारागाने काहीच न बोलता बेडरूममध्ये गेली. तिने पतीशी बोलणे सोडले. दोघांमध्ये अबोला झाला. पती विचारानेच बेशुद्ध झाला. पतीने तिला खरंखरं सांगण्यास सांगितले. ती काहीच बोलत नसल्याने त्याने थेट सोशल मीडियावर हा प्रश्न मांडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पत्नी सुद्धा ओशाळली. कुटुंबातील हा प्रश्न सोशल मीडियावर का नेला म्हणून त्याला भांडली. त्याच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यात पत्नीला दोषी ठरवले आहे. मुलीच्या वाढदिवसाला सुद्धा ती थांबली नसल्याने अनेकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर काहींनी पतीला घरगुती विषय चव्हाट्यावर आणल्यामुळे फटकारले आहे.