सुमारे 15 मिनिटे म्हशी सिंहाला फेकत राहिल्या, पार व्हॉलीबॉल!

| Updated on: Nov 25, 2022 | 4:23 PM

सिंह इतका बलवान आहे की तो कोणत्याही प्राण्याला मारू शकतो. त्याच्या एका गर्जनेने संपूर्ण जंगल थरथरते.

सुमारे 15 मिनिटे म्हशी सिंहाला फेकत राहिल्या, पार व्हॉलीबॉल!
viral video of lion
Image Credit source: Social Media
Follow us on

सिंह हा ‘जंगलाचा राजा’ असला, तरी वेळ आल्यावर सिंहाला धडा शिकविणारे काही प्राणी आहेत. आता फक्त ही क्लिप जी व्हायरल होतीये ती बघा. एका सिंहाला म्हशींच्या कळपातून कोणाची तरी शिकार करायची होती. पण पुढच्याच क्षणी सिंहावरच बॅकफायर होतो. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, जंगली म्हशी सिंहावर हल्ला करतात आणि जंगलाच्या राजाला अर्धमेला करूनच सोडतात. हा व्हिडीओ बघून सिंहाला आजीची आठवण आली असेल.

सिंह इतका बलवान आहे की तो कोणत्याही प्राण्याला मारू शकतो. त्याच्या एका गर्जनेने संपूर्ण जंगल थरथरते. पण, जंगलात एक असा प्राणी आहे, ज्यात सिंहांशी स्पर्धा करण्याची ताकद आहे. एक रानटी म्हैस!

रानटी म्हैस सिंहालाही माघार घेण्यास भाग पाडू शकते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये म्हशींच्या कळपाने सिंहाला चांगलाच इंगा दाखवलाय.

व्हायरल क्लिपमध्ये आपण पाहू शकता की शिकार करण्याच्या उद्देशाने सिंह म्हशींच्या कळपात जातो. पण दुसऱ्याच क्षणी सगळा खेळ उलटा होतो. जंगली म्हशी सिंहावर तुटून पडतात. यानंतर ते सिंहाला मरेपर्यंत त्याला मारत राहतात.

सिंह आणि म्हशींच्या भांडणाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर deon_wildlifephotography नावाच्या अकाऊंटसोबत शेअर करण्यात आला आहे.

यूझरच्या मते, दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात डार्क माने अवोका नावाचा हा सिंह म्हशींच्या कळपात अडकतो आणि आपल्या आयुष्यासाठी संघर्ष करतो. या लढाईत सिंहाला जबर दुखापत झालीये. सुमारे 15 मिनिटे म्हशी सिंहाला फेकत राहिल्या.

हा व्हिडिओ आता झपाट्याने व्हायरल होत आहे. आतापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केलं आहे, तर हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे.

याशिवाय अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. बहुतेक युझर्स सिंहाच्या दुर्दशेवर काळजी व्यक्त करत होते. एका युझरने लिहिले, “जंगलाच्या राजाची अशी दुर्दशा पाहून वाईट वाटले.

त्याचवेळी आणखी एकजण कमेंट करतो, जंगली म्हशींनी त्याला आजीची आठवण करून दिली. आणखी एका युझरने लिहिले की, “सिंहाला अर्धमेला पाहणे वाईट आहे.”