Video : ना फ्रिज, ना मशीन; चक्क सीलिंग फॅनच्या मदतीने बनवलं आईस्क्रिम! देशी जुगाड पाहून नेटकरीही थक्क

घरच्या घरी आईस्क्रिम बनवायचा प्लॅन केला तर निदान फ्रिजची गरज तर असतेच. पण या मुलीने चक्क सीलिंग फॅनच्या मदतीने आईस्क्रिम बनवला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Video : ना फ्रिज, ना मशीन; चक्क सीलिंग फॅनच्या मदतीने बनवलं आईस्क्रिम! देशी जुगाड पाहून नेटकरीही थक्क
homemade icecream video viral
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2026 | 5:06 PM

आईस्क्रिम करण्यासाठी फ्रिज हा गरजेचाच असतो. पण तुम्हाला माहित आहे का सीलींग फॅनच्या मदतीने देखील आईस्क्रिम बनवता येतो. मला माहित आहे माझ्याप्रमाणे तुमचाही या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, पण हे खरंच शक्य आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात एक मुलीने फॅनच्या मदतीने आईस्क्रिम तयार केलाय. नेटकरी तिच्या या देसी जुगाडाचं मनापासून कौतुक करत आहेत.

व्हिडिओमध्ये ती मुलगी सर्वप्रथम दूध गरम करते. त्यानंतर त्यात आइस्क्रिम प्रीमिक्स आणि साखर घालून हे मिश्रण व्यवस्थित ढवळते. मिश्रण थंड झाल्यावर ते ती काही वेळ बाजूला ठेवते.
गुजरातमधील कंटेट क्रिएटर हेतल बरवाडिया हिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Loading...

 

आता खरी गंमत इथून सुरू होते. तयार मिश्रण ती झाकण असलेल्या एका डब्यात भरते. हा डब्बा बर्फ आणि मिठाने भरलेल्या मोठ्या भांड्यात ठेवले. त्यानंतर डब्याच्या झाकणाला दोरी बांधून तिचं दुसरं टोक घरातील सिलींग फॅनला जोडते. सगळी तयारी झाल्यानंतर पंखा सुरू करते. पंखा जसा फिरू लागतो तस डब्यातील मिश्रण सतत घसळत राहते. डब्याभोवती ठेवलेला बर्फ आणि मीठ आईस्क्रिम थंड ठेवण्यासाठी मदत करतात.

नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्या मुलीच्या कल्पकतेचं कौतुक केलं आहे. काहींनी हा देशी जुगाड जिंकला अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी या प्रयोग भन्नाट असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी आईस्क्रिम करण्याची ही जुनी पद्धत पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us