बापरे…एकाच वेळी 9 मुलांना जन्म! गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बराच काळ दोन देशांमध्ये चर्चेत राहिलेला विषय

इतक्या मुलांची प्रसूती झाल्यानंतर विक्रमी 19 महिन्यांनी ते घरी परतले आहे.

बापरे...एकाच वेळी 9 मुलांना जन्म! गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बराच काळ दोन देशांमध्ये चर्चेत राहिलेला विषय
halima cisse give birth to nonuplets
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 15, 2022 | 4:40 PM

नऊ मुलांना एकत्र जन्म दिल्याने एक महिला आणि तिचे संपूर्ण कुटुंब चर्चेत आलंय. या महिलेने मोरोक्कोमध्ये या मुलांना जन्म दिला. एकाच वेळी जन्मल्यामुळे आणि जिवंत राहिल्यामुळे या मुलांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं गेलंय. आता ही सर्व मुलं १९ महिन्यांची झाली आहेत.

“हलीमा किसे” या महिलेचं नाव आहे. हलीमा किसे ही मालीची रहिवासी आहे. ती माली मधून मोरोक्कोला प्रसूतीसाठी गेली होती.

मे 2021 मध्ये मोरोक्कोमध्ये या मुलांचा जन्म झाला होता. आता ती या सर्व मुलांना घेऊन मालीला परतत आहे. म्हणजेच इतक्या मुलांची प्रसूती झाल्यानंतर विक्रमी 19 महिन्यांनी ते घरी परतले आहे.

13 डिसेंबर रोजी सर्व नऊ मुले आई हलीमा आणि वडील अब्देलकादर अरबे यांच्यासोबत मालीची राजधानी बामाकोमध्ये दाखल झाली. नऊ मुलांपैकी पाच मुली आणि चार मुले आहेत.

कदिदिया, फतौमा, हवा, एडमा, ओमू या मुली आहेत, तर मुले मोहम्‍मद 6, ओमर, एल्‍हादजी आणि बाह अशी आहेत.

या कुटुंबाला माली सरकारकडून आर्थिक मदतही मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मुलं जन्माला आली तेव्हा त्यांचं वजन ५०० ग्रॅम ते १ किलो इतकं होतं.

प्री-मॅच्युअर झाल्यामुळे या सर्व मुलांनी पहिला महिना हॉस्पिटलमध्ये घालवला, त्यानंतर सर्व मुलं मोरोक्कोतील एका अपार्टमेंटमध्ये राहायला शिफ्ट झालीत. बऱ्याच काळापासून ही मुलं या दोन देशांत चर्चेचा विषय ठरली आहेत.