3 वर्ष लपूनछपून गुटरगूँ, मामी आणि भाचीच्या लफड्याची गावभर चर्चा, अखेर दोघींनी मंदिरात जाऊन एकत्र…
बेलवा गावातील शोभा कुमारी यांनी त्यांच्या पतीला सोडलं आणि भाची सुमन हिच्याशीच विवाह केला. दोघींचही एकमेकींवर प्रेम असून गेल्या 3 वर्षांपासून त्यांचं अफेअर होतं. त्यांच्या या विवाहाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

बिहारच्या गोपालगंज गावात एक अजबघटना घडल्याचे समोर आले आहे, ते ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. प्रेव विवाहाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील, पण गोपालगंजमध्ये झालेला प्रेम विवाह खूपच वेगळा झाला आहे. तेथे एका महिलेने ( मामी) तिच्या भाचीसाठी तिच्या नवऱ्यालाच सोडलं. एवढंच नव्हे तर पळून जाऊन तिने त्या भाचीशीच लग्नगाठ बांधली. ऐकायला अजब वाटत असलं तरी मामी-भाचीच्या या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
मामी आणि भाची देवळात जाऊन लग्न करून आले. या विवाहाचे अनेक फोटो समोर आले आहेत. दोघीनीही एकमेकींना हार घालून, मंगळसूत्र घातले आणि सात फेरे घेऊन एकमेकांसोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. विधीवत झालेल्या या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत. कुचायकोट येथील सासामुसा रेल्वे स्थानकाजवळील दुर्गा मंदिरात सोमवारी, १२ ऑगस्ट रोजी हा विवाह पार पडला. समोर आलेल्या या विवाहाच्या फोटोंमध्ये दोघीही खूप खुश दिसत आहेत.
3 वर्षांपासून सुरू होतं अफेअर
मिळालेल्या माहितीनुसार, कुचायकोटच्या बेलवा गावातील शोभा कुमारी यांनी सोमवारी त्यांची भाची सुमन कुमारी हिच्याशी विधिवत लग्न केलं. त्या दोघींचं एकमेकींवर खूप प्रेम असून गेल्या 3 वर्षांपासून त्यांच अफेअर सुरू होतं. भाचीच्या प्रेमात वेड्या झालेल्या शोभा यांनी अखेर पतीला सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या पळून गेल्या. त्यानंतर त्या दोघींनी मंदिरात लग्न केलं.

विधीवत केलं लग्न
लाल रंगाच्या कपड्यात मामी आणि भाची या दोघीही सासामुसा रेलवे स्टेशन जवळील दुर्गा मंदिरात गेल्या. तेथे त्यांनी एकमेकींच्या गळ्यात हार घातले, भाचीने मामीला सिंदूर लावला आणि अग्नीच्या साक्षीने दोघींनी एकमेकींसोबत सप्तपदीदेखील घेतल्या. हे आगळं वेगळं लग्न पाहण्यासाठी मंदिराच्या आवारात लोकांची मोठी गर्दी झाली होती.
भाची शोभाच्या प्रेमात मामी सुमन वेडी झाली आहे, ती म्हणाली की, शोभा खूप सुंदर आहे. तिचे दुसऱ्या कोणाशी लग्न झालं तर मला सोडून जाईल या भीतीपोटी आम्ही मंदिरात लग्न केले. दोघींनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून लग्नाची माहिती कुटुंबीयांना दिली. आम्ही आता आयुष्यभर एकत्र राहू असं त्यांनी सांगितलं. हे लग्न आम्ही आमच्या मरजीने केलंय, कोणीही दबाव टाकला नसल्याचं भाचीने सांगितलं.
