AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या ग्लासमध्ये कोणतं Drink? ही स्पर्धक ओळखते की नाही? पाहा ‘हा’ Viral video

Challenge video : वेगवेगळे चॅलेंजेस घ्यायला कोणाला नाही आवडत? यासंबंधीचे व्हिडिओही सोशल मीडियावर (Social media) अधूनमधून व्हायरल (Viral) होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. एक महिला स्पर्धक यात दाखवलीय.

कोणत्या ग्लासमध्ये कोणतं Drink? ही स्पर्धक ओळखते की नाही? पाहा 'हा' Viral video
पेय ओळखण्याचं अनोखं चॅलेंज स्वीकारणारी महिलाImage Credit source: Youtube
| Updated on: Mar 08, 2022 | 7:30 AM
Share

Challenge video : वेगवेगळे चॅलेंजेस घ्यायला कोणाला नाही आवडत? जर का छोटे मोठे आव्हान असेल किंवा एखादा हलका फुलका खेळ, तो खेळायला आपल्याला आवडतं. कधी कधी त्यात दोन तीन स्पर्धक असतात किंवा मग एखादाच स्पर्धक असतो. स्वतंत्रपणे दिलेलं टार्गेट किंवा चॅलेंज पूर्ण करायचं. आता चॅलेंज पूर्ण झालं तर आपल्याला आनंद होणार मात्र जर का त्यात काही चूक झाली, की मात्र त्यातून आपण बाद होणार. यासंबंधीचे व्हिडिओही सोशल मीडियावर (Social media) अधूनमधून व्हायरल (Viral) होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. एक महिला स्पर्धक यात दाखवलीय आणि तिला वेगवेगळे पेय (Drinks) घेऊन त्यासमोर तो अचूक ओळखायचा आहे. या महिलेला तो ओळखता येतो की नाही, हे या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळतं. हा व्हिडिओ अत्यंत मजेदार असून सध्या व्हायरल झालाय.

ग्लाससमोर ठेवला कोणता कॅन?

व्हिडिओमध्ये आपल्याला एक महिला स्पर्धक अनोखं चॅलेंज घेताना दिसते. तिच्यासमोर चार ग्लास ठेवलेले आहेत. अर्थात ते तिच्याबाजूनं झाकलेले आहेत. या चारही ग्लासमध्ये चार वेगवेगळ्या फ्लेवर्सचे ड्रिंक आहे. तर ते ड्रिंक ज्या कॅनमधून काढलेले आहे, ते कॅन म्हणजेच त्या पेयाच्या ब्रॅण्डचे कॅन शेजारी ठेवलेले आहेत. आता त्या ड्रिंकची चव घ्यायची आणि त्याच्यासमोर योग्य असा कॅन ठेवायचा, असं हे चॅलेंज आहे. पण ही स्पर्धक काही त्यात यशस्वी होत नाही. तिनं ग्लाससमोर भलताच कॅन ठेवल्याचं दिसतं.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर देमरिकी (Demariki) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. ‘She couldn’t guess’ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. हा व्हिडिओ अत्यंत मजेशीर असून आपलं मनोरंजन करतो. यूझर्स या व्हिडिओवर भरभरून कमेंट्स करत आहेत. काही तासांपूर्वी अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला सव्वा सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात चांगलीच वाढही होते. आता हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्वीकारणार का हे चॅलेंज? (Video courtesy – Demariki)

आणखी वाचा :

Viral : ‘माफी मागतो, पुन्हा बदाम विकणार’, असं का म्हणाला भुबन बद्याकर? वाचा…

Kid shocking video : जिराफाला खाऊ घालायला जातो चिमुरडा आणि होतं असं काही, की आई-वडिलांना फुटतो घाम!

Funny Video viral : ‘जय महाराष्ट्र, हरहर महादेव, जय बजरंग बली, काका, काकू, मामा, मामी…; पाळण्यात बसल्यावर मुलाला हे काय झालं?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.