AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Music Day 2025: का साजरा करतो ‘संगीत दिन’? इतिहास, महत्त्व आणि फायदे वाचा एका क्लिकवर

२१ जून रोजी दरवर्षी साजरा केला जाणारा ‘जागतिक संगीत दिन’ (World Music Day) हा केवळ एक उत्सव नसून, संगीताच्या वैश्विक भाषेला दिलेला एक सन्मान आहे. त्यामुळेच या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत या दिवसाचा इतिहास, त्यामागील उद्देश आणि संगीताचे मानसिक व शारीरिक फायदे.

World Music Day 2025: का साजरा करतो ‘संगीत दिन’? इतिहास, महत्त्व आणि फायदे वाचा एका क्लिकवर
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jun 20, 2025 | 3:20 PM
Share

संगीत म्हणजे आत्म्याला स्पर्श करणारी एक अमूर्त भावना. हीच भावना व्यक्त करण्यासाठी आणि संगीत व कलाकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २१ जून रोजी जागतिक संगीत दिन (World Music Day) साजरा केला जातो. हा दिवस आज जगभरातील संगीतप्रेमींसाठी खास असतो, कारण यानिमित्ताने वेगवेगळ्या देशांमध्ये संगीतमय कार्यक्रम, परफॉर्मन्स, स्ट्रीट कॉन्सर्ट्स आणि ओपन माइकचे आयोजन केले जाते.

संगीताचं मानवी जीवनात महत्त्व

संगीत आणि माणसाचं नातं हे अतूट आहे. आपण आनंदी असलो की गातो, नाचतो आणि जेव्हा दु:खी असतो तेव्हाही हळुवार सूरांत मन शांत करण्याचा प्रयत्न करतो. लग्न समारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम किंवा अगदी छोट्या भेटीगाठींमध्येही संगीताचं स्थान अबाधित आहे. संगीत केवळ कानाला आनंद देत नाही, तर मनालाही साक्षात स्पर्श करतं. त्यामुळेच आज अनेक ठिकाणी ‘म्युझिक थेरपी’ वापरून उपचार केले जात आहेत.

संगीत दिनाची सुरुवात कशी झाली?

जागतिक संगीत दिन साजरा करण्याची कल्पना प्रथम १९८१ साली फ्रान्समध्ये मांडली गेली. तत्कालीन सांस्कृतिक मंत्री मौरिस फ्ल्यूरेट यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि जॅक लंग यांच्या सहकार्याने २१ जून १९८२ रोजी फ्रान्समध्ये पहिल्यांदा ‘फेटे द ला म्युझिक’ (Fête de la Musique) हा कार्यक्रम झाला. ही संकल्पना इतकी लोकप्रिय ठरली की अल्पावधीतच ती संपूर्ण युरोप आणि नंतर जगभर पसरली.

संगीत दिनाचा हेतू आणि संदेश

या दिवशी जगभरात संगीत प्रेमी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. रस्त्यांवर उघड्या जागी परफॉर्मन्स, शाळा-कॉलेजांमध्ये संगीत स्पर्धा, विविध प्रकारचे गायन-वादनाचे कार्यक्रम भरवले जातात. या सगळ्यांचा उद्देश एकच संगीतामधून प्रेम, शांतता आणि एकात्मतेचा संदेश देणं.

या दिवशी जगभरात नामांकित कलाकार, नवोदित गायक-वादक आणि संगीत शिक्षक यांचा गौरव केला जातो. अनेक देशांत संगीताच्या विविध शैलींना समर्पित कार्यक्रम आयोजित करून संगीताच्या विविधतेचा सन्मान केला जातो.

संगीत दिनाचे आधुनिक स्वरूप

आजच्या डिजिटल युगातही संगीताची ताकद कमी झालेली नाही. उलट, ओटीटी प्लॅटफॉर्म्स, ऑनलाइन स्ट्रीमिंग अ‍ॅप्स आणि सोशल मीडियावर संगीताने मोठं स्थान मिळवलं आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने अनेक ऑनलाइन कॉन्सर्ट, लाईव्ह सत्रं आणि डिजिटल गान महोत्सव साजरे होत आहेत.

संगीताचे फायदे

1. संगीत ऐकल्याने मन शांत होतं, चिंता आणि तणाव कमी होतो.

2. संगीत मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना देतं. विद्यार्थ्यांसाठी क्लासिकल म्युझिक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असतं.

3. संगीत रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतं, झोप सुधारतं आणि संपूर्ण शरीराला रिलॅक्स करते.

4. आनंद, दु:ख, प्रेम यांसारख्या भावना व्यक्त करण्यासाठी संगीत एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे नातेसंबंधही मजबूत होतात.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.