Viral : सहाव्या वर्षी पहिला भव्य वाडा, सुपर कार्स आणि बरंच काही; कोण आहे ‘हा’ सर्वात तरूण अब्जाधीश?

Youngest Billionaire : एक 9 वर्षांचा नायजेरियन (Nigerian) मुलगा चर्चेत आहे. मोहम्मद अवल मुस्तफा उर्फ ​​मोम्फा ज्युनियर (Muhammed Awal Mustapha AKA Mompha Junior) एक श्रीमंत लाइफ (Rich life) जगत आहे.

Viral : सहाव्या वर्षी पहिला भव्य वाडा, सुपर कार्स आणि बरंच काही; कोण आहे 'हा' सर्वात तरूण अब्जाधीश?
मोहम्मद अवल मुस्तफा उर्फ ​​मोम्फा ज्युनियर, तरूण अब्जाधीश (सौ. इन्स्टाग्राम)
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 2:10 PM

Youngest Billionaire : वयाच्या 9व्या वर्षी, आपल्यापैकी बहुतेकांना कदाचित एक अब्ज म्हणजे काय हे माहीतही नसेल. पण सर्वजण सारखे नसतात. एक 9 वर्षांचा नायजेरियन (Nigerian) मुलगा, ज्याला त्याच्या उंची जीवनशैलीमुळे ‘जगातील सर्वात तरूण अब्जाधीश‘ म्हटले जात आहे. मोहम्मद अवल मुस्तफा उर्फ ​​मोम्फा ज्युनियर (Muhammed Awal Mustapha AKA Mompha Junior) एक श्रीमंत लाइफ (Rich life) जगत आहे. कारण वयाच्या सहाव्या वर्षी त्याची स्वत:ची पहिली हवेली होती. ‘द सन’च्या वृत्तानुसार, मोम्फादेखील एका खाजगी जेटने जगाचा प्रवास करतो. त्याच्याकडे इतरही भव्य वाडे आहेत. एवढेच नाही, तर सुपरकार्सचा संपूर्ण ताफा आहे. मोम्फा ज्युनियर हा लागोस, नायजेरियाचा रहिवासी आहे. मोम्फा सिनियरचा तो मुलगा आहे. त्याच्या या लाइफस्टाइलचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

वापरतो स्टायलिश ब्रँड

मॉम्फा ज्युनियरचे Instagram खात्यावर 45,200पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, जिथे तो त्याच्या भव्य जीवनशैलीची छायाचित्रे पोस्ट करतो. मुलगा त्याच्या सुपरकार्सच्या शेजारी उभा असताना, Versace आणि Gucciसारख्या ब्रँडसह स्टायलिश आणि डिझायनर कपडे घातलेला दिसतो. दुसऱ्या एका छायाचित्रात तो एका खासगी जेटमध्ये जेवण करताना दिसत आहे. हा तरूण अब्जाधीश त्याच्या वडिलांच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या धाकट्या बहिणीसोबत रोज दिसतो.

सहाव्या वाढदिवशी वडिलांनी वाडा दिला भेट

संग्रहाचे प्रदर्शन करताना Momfa Jrच्या काही फोटोंना कॅप्शन दिले होते: ‘हॅपी बर्थडे टू मी’ आणि ‘थँक्स डॅडी’. त्याच्या सुपरकार्सच्या कलेक्शनमध्ये पिवळी फेरारी, बेंटले फ्लाइंग स्पर आणि रोल्स-रॉयस राईथ यांचाही समावेश आहे. द सनमधील वृत्तानुसार, मोम्फा सीनियरने 2018मध्ये त्याच्या सहाव्या वाढदिवशी मोम्फा जूनियरला पहिला वाडा भेट दिला होता.

आणखी वाचा :

‘यह तो आशा की लहर है, यह तो उम्मीद की सेहर है’, गुरू रंधावानं शेअर केला चिमुकल्याचा हृदयस्पर्शी Video

Food viral video : पाणीपुरीवर अत्याचार! यूझर्स म्हणतायत, हे पाहून भूकच गेली

Deer video viral : जीव वाचवण्यासाठी हरिणांनी लढवली अनोखी शक्कल, रिकाम्या पोटी जंगली कुत्र्यांना फिरावं लागलं परत!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.