ग्लॅमरचे जग सोडून ‘तो’ मारतोय झाडू, प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील तो तरूण कोण ?
WWE Wrestler Rinku Singh Premanand Ji ashram: WWE चा प्रसिद्ध कुस्तीपटू रिंकू सिंगने ग्लॅमरचे जग सोडून आता आध्यात्मिक मार्ग स्वीकारला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तो झाडू मारताना दिसतोय.

WWE Wrestler Rinku Singh Premanand Ji ashram: वृंदावनमधील प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यातील एका व्यक्तीला पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. प्रसिद्धी, ग्लॅमरचे जग माणूस आश्रमात चक्क झाडू मारताना दिसतोय. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हे तर भारताच्या वतीने डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये खेळलेला कुस्तीपटू रिंकू सिंह उर्फ वीर आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत त्याचा अनोख , वेगळाच अंदाज दिसत असून एका दृश्यात तर तो चक्क रस्त्यावर झाडू मारताना दिसतो.
रिंकू सिंग हा एक प्रसिद्ध बेसबॉल खेळाडूही आहे. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांना आश्चर्य वाटले. क्रीडा जगतात आपल्या सामर्थ्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी ओळखला जाणारा माणूस इतका नम्र असेल अशी चाहत्यांना अपेक्षा नव्हती.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये माजी डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीपटू आणि बेसबॉलपटू रिंकू सिंह वृंदावनमधील प्रेमानंदजी महाराज यांच्या आश्रमात झाडू मारताना दिसत आहे. व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी वीर याच्याबद्दल कमेंट्स करत स्तुतीचे पूल बांधलेले आहेत.
रिंकू सिंगचं ट्रान्सफॉर्मेशन
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रिंकू सिंगचा अमेजिंग ट्रान्सफॉर्मेशन दाखवण्यात आलं आहे. व्हिडिओची सुरुवात माजी डब्ल्यूडब्ल्यूई कुस्तीपटूच्या वेगवेगळ्या हायलाइट्ससह होते. त्यानंतर तो कपाळावर टिळा घेऊन साधूच्या वेषात रस्त्यावर झाडू मारताना दिसू शकतो. व्हिडिओमध्ये तो प्रथम बेसबॉल खेळाडू कसा बनला, नंतर डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये कसा गेला आणि शेवटी अध्यात्माकडे कसा वळला याचा त्याचा प्रवास दाखवला आहे. व्हिडिओसह एक कॅप्शन देखील शेअर केले गेले आहे, “बेसबॉल, डब्ल्यूडब्ल्यूई ते वृंदावन – रिंकू सिंहचे आध्यात्मिक बदल, असं त्यात लिहीण्यात आलं आहे.
View this post on Instagram
रिंकू सिंगच्या प्रवासावर तयार झाला हा चित्रपट
87 मैल प्रतितास वेगाने बेसबॉल फेकल्यानंतर रिंकू सिंगच्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात कशी झाली याबद्दलच्या प्रवासावरही या व्हिडिओमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. व्यावसायिक बेसबॉल खेळणारा रिंकू सिंग हा पहिला भारतीय ठरला. अमेरिकन मायनर लीगमध्ये अनेक हंगाम घालवले. त्याच्या बेसबॉल प्रवासावर, 2014 मध्ये डिस्नेने “मिलियन डॉलर आर्म” नावाचा एक चित्रपटही बनविला होता. हा चित्रपट त्याच्या आणि दिनेश पटेलच्या सत्य कथेवर आधारित आहे, ज्यांना स्पोर्ट्स एजंट जेबी बर्नस्टीनने एका रिॲलिटी शो स्पर्धेत शोधले होते.

डब्ल्यूडब्ल्यूईच्या जगात चर्चेत
‘द ग्रेट खली’नंतर रिंकू सिंगने 2018 मध्ये डब्ल्यूडब्ल्यूईच्या विश्वात प्रवेश केला. रिंगमध्ये रिंकू सिंगला रिंगमध्ये वीर महान म्हणून ओळखले जात होते. त्याने जॉन सीना आणि द ग्रेट खली सारख्या मोठ्या नावांशी स्पर्धा केली. कपाळावर टिळा घातलेला, धोतर-प्रेरित पोशाख परिधान केला आणि रुद्राक्षाचा हार परिधान करून, देसी लूकने त्याला डब्ल्यूडब्ल्यूईच्या मंचावर एक वेगळी ओळख दिली. व्हिडिओचा सर्वात हृदयस्पर्शी भाग म्हणजे प्रेमानंद महाराज यांच्याशी त्याचे संभाषण. आध्यात्मिक गुरु त्यांना सांगतात, “जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या जगासाठी पात्र आहात, तर या.” ज्यावर रिंकू हसतो आणि हात जोडून हळू हळू उत्तर देतो’. त्याचा नवा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.
