AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो भारतीय, ती चिनी… सीमेवर तणाव पण नात्यात प्रेम! हिंदी चिनी husband wife ची अनोखी कहाणी

नवरा भारतातला आहे, बायको चीनची आहे, पण या नात्यात तणाव नसून प्रेम आहे.

तो भारतीय, ती चिनी... सीमेवर तणाव पण नात्यात प्रेम! हिंदी चिनी husband wife ची अनोखी कहाणी
India China Love StoryImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Dec 21, 2022 | 6:52 PM
Share

हे बघितलं की ‘हिंदी-चीनी भाई भाई’ हा डायलॉग आठवतो. दोन्ही देशांमध्ये अनेकदा तणावाचं वातावरण असतं. अलिकडेच अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती, त्यात भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा पाठलाग केला, मात्र या चकमकीत दोन्ही देशांचे काही सैनिक जखमी झाले. बरं, दोन्ही देशांतील हा तणाव सर्वश्रुत आहेच, पण मध्यंतरी एक जोडपं सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलंय. त्याचं कारण म्हणजे नवरा भारतातला आहे, बायको चीनची आहे, पण या नात्यात तणाव नसून प्रेम आहे. ही लव्ह स्टोरी खूप फेमस झालीये.

वास्तविक, हे प्रकरण असे आहे की, चीनमध्ये राहणारी होउ जोंग नावाची एक मुलगी छत्तीसगडमधील रहिवासी असलेल्या लोकेश कुमारच्या प्रेमात पडते आणि मग त्या दोघांचे लग्न होते.

विशेष म्हणजे लोकेश हा योग शिक्षक आहे, होउ जोंग ही त्याची विद्यार्थिनी होती. योग शिकता शिकता दोघांमध्ये प्रेम फुललं आणि मग त्यांचं प्रेम इतकं वाढलं की दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लोकेशने स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यू ट्यूबवर (यू ट्यूब व्हिडिओ) एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि आपल्या प्रेमकथेबद्दल सांगितले आहे.

लोकेशच्या म्हणण्यानुसार, तो छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. लहानपणापासूनच योगाची आवड असल्याने सुरुवातीच्या अभ्यासानंतर योगशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तो हरिद्वारला गेले.

योगशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरीसाठी दिल्लीला गेले. दरम्यान, चीनमधील एका भारतीय संस्थेत योग शिक्षकाची जागा रिक्त असल्याची माहिती त्यांना मिळाली. मग काय, त्याने अर्ज केला आणि त्याची निवडही झाली.

चीनच्या बीजिंग येथील योग संस्थेत त्यांची भेट होउ जोंगशी झाली, जी तेथे योग शिकण्यासाठी येत असे. याच दरम्यान योग शिकताना होउ जोंग लोकेशच्या प्रेमात पडली आणि विशेष म्हणजे तिने स्वत: लोकेशला प्रपोज केले.

काही दिवसांनी त्यांच्या नात्यात थोडी कटुता आली आणि त्यांचे ब्रेकअप झाले पण नंतर काही वेळाने दोघांचे बोलणे सुरू झाले आणि मग त्यांनी लग्न केले. 2019 साली दोघांनी लग्न केलं. सध्या त्यांना एक मूलही आहे, त्याचं नाव रशिया आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान