Touch Wood : आनंद झाल्यानंतर का म्हणतात ‘टच वूड’? फार कमी लोकांना माहिती आहे कारण?
Touch Wood : आनंदाची बातमी मिळाल्यानंतर 'टच वूड' म्हणता, पण का? काय आहे 'टच वूड' शब्दाचा अर्थ? फार कमी लोकांना आहे माहिती... अनेक शब्दांबद्दल आपल्याला फार काही माहिती नसतं, पण अशा शब्दांचा अर्थ फार मोठा असतो...
मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये असे अनेक शब्द येतात, जे केव्हा बोलायचे आपल्याला माहिती असतात. पण काही शब्दांचा नेमका अर्थ काय असेल, हे अनेकांना माहिती नसतं. आपण ज्या शब्दाचा वापर करतोय तो शब्दाची निर्मिती कशी झाली आणि का झाली याबद्दल देखील कल्पना नसते. अशाच शब्दांपैकी एक म्हणजे ‘टच वूड’ (Touch Wood). ‘टच वूड’ हा शब्द आजच्या काळात फार कॉमन आहे. पण आनंदाच्या क्षणी किंवा काहीही चांगलं झाल्यानंतर ‘टच वूड’ शब्द का वापरतात? तुम्हाला माहिती आहे. काहीतरी चांगलं झालं की ‘टच वूड’ बोलायचं असतं एवढंच आपल्याला माहिती असतं.
सांगायचं झालं तर, ‘टच वूड’ फक्त बोलयाचं नाही तर, कोणत्याही लाकडी वस्तूला स्पर्श करायचा असतो. तर आज जाणून घेवू ‘टच वूड’ शब्दाचा नेमका अर्थ काय आहे.
‘टच वूड’ हा शब्द इ.स.पू. पासून वापरात आहे. ‘टचवूड’ म्हटल्यानंतर लगेच लाकडी वस्तूंना स्पर्श करायचा असतो. कारण झाडांमध्ये देखील आत्मा असते आणि तुमच्या आनंदाला कोणाची नजर लागू नये म्हणून ‘टचवूड’ शब्दाचा वापर केला जातो. असा देखील समज आहे… आपण रोज अनेकदा ‘टच वूड’ शब्दाचा वापर करतो.
‘टच वूड’ म्हटल्यानंतर लगेच लाकडी वस्तूला स्पर्श करायचा असतो. ज्यामुळे आपल्या आयुष्यात सर्वकाही चांगलं होतं… असं देखील मानलं जातं.. याचा अर्थ आपल्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यातील चांगल्या क्षणांना कोणाची नजर लागू नये म्हणून देखील ‘टच वूड’चा वापर करतात.
आजच्या पिढीमध्ये तर ‘टच वूड’ शब्दाचा वापर सर्रास केला जातो. ‘टच वूड’ सारख्या शब्दचा प्रयोग जगाच्या प्रत्येक भागात करण्यात येतो. आधुनिक काळातील इंग्लंडमध्ये, लोक ‘नॉक ऑन द वूड’ ऐवजी ‘टच वूड’ हा शब्दप्रयोग वापरायचे, याचा उल्लेख इंग्रजी लोककथांमध्ये करण्यात आला आहे.
भारतात देखील ‘टच वूड’ या शब्दाचा वापर होतो. अनेक सेलिब्रिटी देखील कायम ‘टच वूड’चा वापर करताना दिसतात. एवढंच नाही तर, शाळेतील आणि कॉलेजमधील विद्यार्थी देखील कायम ‘टच वूड’ या शब्दाचा वापर करताना दिसतात.
(टीप : वरील लेख सामान्य समजुतींवर आधारित आहे. याच्या तथ्यांबद्दल ‘टीव्ही 9’ मराठी कुठलाही दावा करीत नाही.)