video | पठ्ठ्याचा डान्स पाहून अनेकजण फिदा, लोक म्हणातायत हा तर दुसरा मायकल जॅक्सन !, डान्सचा व्डिडीओ व्हायरल

video | पठ्ठ्याचा डान्स पाहून अनेकजण फिदा, लोक म्हणातायत हा तर दुसरा मायकल जॅक्सन !, डान्सचा व्डिडीओ व्हायरल
तरुण रस्त्यावर थिरकताना दिसतोय.

सध्या एक तरुण नेटकऱ्यांच्या मनावर राज्य करतोय. त्याने केलेल्या डान्समुळे तो नेटकऱ्यांच्या दुसरा मायकल जॅक्सन ठरतोय. (young boy dancing video michael jackson)

prajwal dhage

|

Mar 31, 2021 | 11:39 PM

मुंबई : असं म्हणतात की देवाने प्रत्येकाला एकतरी कला बहाल केलेली आहे. या कलेचा योग्य वापर करता आला तर य़शाचे शिखर गाठणे सहज आणि सोपे होते. या जगात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी आपल्या कलागुणांना एवढा वाव दिला, की याच कलेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण जगावर राज्य केलं. सध्या असाच एक तरुण नेटकऱ्यांच्या मनावर राज्य करतोय. त्याने केलेल्या डान्समुळे तो नेटकऱ्यांच्या दुसरा मायकल जॅक्सन (Michael Jackson) ठरतोय. (young boy dancing on road like Michael Jackson video goes viral)

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

सध्या एका तरुणाच्या डान्सचा व्हिडीओ भन्नाट व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे तरुण एका कारमध्ये बसलेला आहे. सिग्नलजवळ कार थांबताच तो गाडीच्या दरवाजा उघडून थेट रस्त्यावर उतरतो. त्यानंतर अचानकपणे तो रस्त्यावरच नाचताना दिसतोय. बरं तो सर्वसामान्यांसारखं न नाचता थेड डान्सचा लिजेंड असलेल्या मायकल जॅक्सनच्या डान्सची कॉपी करताना दिसतोय. त्याच्या साधनेच्या जोरावर तो अगदी मायकल जॅक्सनसारखाच नृत्य करताना दिसतोय.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर काही क्षणांत चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल 70 लाख लोकांनी पाहिलं आहे. David Herrmann नावाच्या व्यक्तीने या व्हिडीओला शेअर केले आहे. या तरुणाचा अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तो मायकल जॅक्सनसारखा स्लो मोशन डान्स तसेच मुनवॉक करताना दिसतोय. हा दुसरा व्हिडीओ Kamil Szpejenkowski या व्यक्तीने शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, या तरुणाचा हा व्हिडीओ काही क्षणांत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याच्या डान्सच्या व्हिडीओला लाखोंनी लाईस्क मिळत असून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. हा तरुण म्हणजे दुसरा मायकल जॅक्सन असल्याचेही अनेकांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे.

इतर बातम्या :

प्रेमासाठी मुलाने चक्क तोडून आणला चंद्राचा तुकडा, Viral Video पाहून तुम्ही पोट धरून हसाल…

#HeraPheri चित्रपटाला 21 वर्षे पूर्ण, चाहत्यांनी धमाल मीम्स शेअर करत व्यक्त केला आनंद!

VIRAL VIDEO : विषारी साप आणि मुंगूसाची जबरदस्त फायटिंग, शेवटी कोण जिंकलं तुम्हीच पाहा…

(young boy dancing on road like Michael Jackson video goes viral)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें