Video | एकाकीपणा घालवण्यासाठी तरुणाचा जबरदस्त जुगाड, नेटकरी म्हणतायत हा तर सर्वोत्तम उपाय !

सध्या तर एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने एकाकीपणा घालवण्यासाठी मजेदार जुगाड केले आहे.

Video | एकाकीपणा घालवण्यासाठी तरुणाचा जबरदस्त जुगाड, नेटकरी म्हणतायत हा तर सर्वोत्तम उपाय !
SLEEPING BOY VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 5:55 PM

मुंबई : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ हे अगदीच मजेदार आणि हसायला लावणारे असतात. तर काही व्हिडीओ हे आपल्याला भावूक करुन जातात. सध्या तर एक वेगळाच व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने एकाकीपणा घालवण्यासाठी मजेदार जुगाड केले आहे. (young boy tailing tricks for singles saying how to not feel alone video went viral on social media)

तरुणाकडून एकाकीपणा घालवण्यासाठी प्रयत्न

या व्हिडीओमध्ये एक तरुण दिसतो आहे. तो आपल्या बेडवर झोपला आहे. सोबतच त्याच्या समोर एक उशी आहे. उशीबरोबरच त्याच्याजवळ मुलीचा एक ड्रेस आहे. याच ड्रेसच्या मदतीने हा तरुण त्याचा एकाकीपणा घालण्याचा प्रयत्न करतोय.

कोणीतरी कुरवाळत असल्याचा तरुणाला भास

त्याने मुलीच्या ड्रेसमध्ये स्वत:चा एक हात घातला आहे. तसेच या हाताच्या मदतीने हा तरुण स्वत:लाच कुरवाळत आहे. ड्रेसमध्ये हात घालून स्व:तला कुरवाळत असल्यामुळे त्याला कोणीतरी आपल्या जवळ असल्याचा भास होत आहे. हा मजेदार व्हिडीओ पाहून नेटकरी खूश झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात एकटेपणा घालवण्यासाठी हा अतिशय चांगला उपाय असल्याचे काही जण सांगत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र, या व्हिडीओला hepgul5 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले असून सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

Video | ‘मैं शराबी हूं’ गाण्यावर तरुण थिरकला, हावभाव पाहून सोशल मीडियावर धुमाकूळ

Video | कार आणि बाईकवर थरारक स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहाच

Video | लग्नानंतर नात्यामध्ये काय बदल होतो ? मजेदार व्हिडीओ पाहाच

young boy tailing tricks for singles saying how to not feel alone video went viral on social media