AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Instant Loan : ‘Hi’ टाईप करा, 10 मिनिटांत 10 लाखांचे कर्ज झटपट खात्यात!

Instant Loan : आता तुम्हाला पण झटपट कर्ज मिळू शकते. तेही कोणत्याही कागदपत्रांशिवाय, 10 मिनिटांत 10 लाखांचे कर्ज मिळविण्यासाठी करावं लागेल मात्र हे काम...

Instant Loan : 'Hi' टाईप करा, 10 मिनिटांत 10 लाखांचे कर्ज झटपट खात्यात!
कर्ज मिळवा झटपट
| Updated on: May 09, 2023 | 10:16 AM
Share

नवी दिल्ली : कर्जाची आवश्यकता कधी ना कधी पडतेच. कर्ज घेताना मात्र भल्याभल्यांचे नाकीनऊ येतात. कागदपत्रांची मोठी यादी देण्यात येते. या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. बँकेकडे अनेक फेऱ्या माराव्या लागतात. विविध कागदपत्रांची अस्सल प्रत आणि झेरॉक्स कॉपीसोबत न्यावी लागते. पण आता डिजिटल जमाना आला आहे. त्यामुळे ऑनलाईन कर्जाची (Online Loan) सुविधा वाढत आहे. काही बँका, वित्तीय संस्था त्यांच्या मोबाईल ॲप आणि ऑनलाईन साईटच्या माध्यमातून त्वरीत कर्ज मिळवून देतात. पम आता या खासगी वित्तीय कंपनीने ग्राहकांना व्हॉट्सअपवर झटपट कर्ज (WhatsApp Instant Loan) सुविधा सुरु केली आहे. आता तुम्हाला पण झटपट कर्ज मिळू शकते. तेही कोणत्याही कागदपत्रांशिवाय, 10 मिनिटांत 10 लाखांचे कर्ज मिळविण्यासाठी करावं लागेल मात्र हे काम…

100 टक्के डिजिटल प्रक्रिया आयआयएफएल फायनान्स (IIFL Finance) या खासगी कंपनीने ग्राहकांसाठी ही झटपट कर्ज सुविधा आणली आहे. ही वित्तीय कंपनी ग्राहकांना 10 लाख रुपयांपर्यंत बिझनेस लोन, व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करणार आहे. व्हॉट्सअपवर झटपट कर्ज देण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा कंपनीने केला आहे. MSME Loan देण्याची ही सुविधा अनेकांना फायदेशीर ठरेल. विशेष म्हणजे कर्जासाठी अर्ज करण्यापासून ते कर्जाची रक्कम खात्यात जमा होण्यापर्यंतची सर्व प्रकारची प्रक्रिया 100 टक्के डिजिटल असेल.

काय करावे लागेल व्हॉट्सअपवर झटपट कर्ज मिळविण्यासाठी ग्राहकांना डिजिटल प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 10 मिनिटांत 10 लाखांचे कर्ज मिळविण्यासाठी ग्राहकांना एआई-बॉटच्या काही प्रश्नांना उत्तर द्यावे लागेल. ॲप्लिकेशन प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला 9019702184 या व्हॉट्सअप क्रमांकावर “हाय” टाईप करुन पाठवावे लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस, कागदपत्राविना होईल.

आईआईएफएल फायनान्स काय आहे आईआईएफएल फायनान्स ही भारतातील सर्वात मोठी रिटेल एनबीएफसीपैकी एक आहे. IIFL कडे 10 दशलक्षहून अधिकचे ग्राहक आहेत. यामध्ये बँकेशीसंबंधित कमी ग्राहक आहेत. ही कर्जाची सुविधा छोट्या आणि लघु उद्योगांना पाठबळ देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या कंपनीच्या अनेक शाखा आहेत. हे कर्ज डिजिटल पद्धतीने उपलब्ध आहे.

छोट्या व्यापाऱ्यांसाठी सुविधा आयआयएफल फायनान्स खास करुन छोटे व्यापारी, व्यावसायिकांसाठी ही सुविधा देत आहे. हाच वर्ग त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. बिझनेस हेड भारत अग्रवाल यांनी ही प्रक्रिया पेपरलेस असून कर्ज वितरण ही अत्यंत सुलभ असल्याचा दावा केला आहे. . आयआयएफएल फायनान्स सध्या व्हॉट्सअप कर्ज चॅनलद्वारे 1 लाख एमएसएमई क्रेडिट माहिती सेवा देऊ शकते. व्हाट्सअप कर्जासाठी एक कृत्रिम बुद्धीमतेवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर होईल. त्याला एआई-बॉट असे म्हणतात. तुम्ही अर्ज केल्यानंतर, तो योग्य वाटल्यास, तुम्ही पात्र ठरल्यास, लागलीच कर्ज मंजूर होईल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?