AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Bond | स्वातंत्र्यदिनी आणखी एक गुड न्यूज, पुन्हा स्वस्तात सोने खरेदी करा, मोदी सरकारने काढला सुवर्ण मुहुर्त

Gold Bond | या योजनेत गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंत सोने खरेदी करू शकतो. संस्थेला मात्र सुवर्ण रोखे योजनेत 20 किलो सोने खरेदी करता येते. गोल्ड बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे.

Gold Bond | स्वातंत्र्यदिनी आणखी एक गुड न्यूज, पुन्हा स्वस्तात सोने खरेदी करा, मोदी सरकारने काढला सुवर्ण मुहुर्त
सुवर्ण रोख्यात गुंतवणुकीची संधीImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 15, 2022 | 10:54 AM
Share

Gold Bond | स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day 2022 News) चैतन्यमयी वातावरणात आणखी एक गुड न्यूज येऊन धडकली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी (Azadi ka Amrit Mahotsav) वर्ष साजरे करताना सरकारने सुवर्ण खरेदीची सुवर्ण संधी खरेदीदारांना उपलब्ध करुन दिली आहे. सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) सातत्याने चढ उतार होत असते. आता तर भारतातच बुलियन एक्स्चेंजची(Billion Exchange) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोने आयात करणे सोप्पं झालं आहे. त्याचबरोबर देशभरात काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आता सोन्याचा एकच भाव (One Nation One Rate) राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे हे फायदेशीर ठरणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme 2022-23)आणली आहे. गोल्ड बाँडच्या विक्रीचा हा दुसरा टप्पा आहे. या योजनेची दुसरी मालिका 22 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 26 ऑगस्ट रोजी शेवटचा दिवस असेल. सध्या सोन्याचे रोखे कोणत्या किंमतीला जारी केले जातील याची घोषणा करण्यात आलेली नाही. रिझर्व्ह बँकेने या वर्षी 20 जून ते 24 जून दरम्यान पहिली मालिका सुरू केली होती.

सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय

सोन्यात गुंतवणुकीचे (Gold Investment) अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. भारतीयांचे सुवर्णवेड जगप्रसिद्ध आहे. चीन नंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने आयातदार आहे. किमतींतील अस्थिरता पाहता बाजारातील तज्ज्ञ आता सोन्यात हळूहळू आणि विविध पर्यायांसह गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. भारतात सोन्यात गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत ज्यांचा वापर केला जाऊ शकतो. साधारणपणे गुंतवणुकीचे तीन भाग केले जाऊ शकतात ज्यात सॉलिड सोने (Solid Gold) , पेपर सोने (Paper Gold) आणि डिजिटल सोने (Digital Gold) यांचा समावेश आहे.

1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंत सोने खरेदी करा

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत, सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने हातात देत नाही. परंतु सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. तर संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांची इच्छा असल्यास, ते 5 व्या वर्षानंतर बाँडमधून बाहेर पडू शकतात.

खरेदीवर 500 रुपये नफा

सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट् आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्‍या आणि पैसे भरणार्‍या गुंतवणूकदारांना इश्यू किंमतीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट दिली जाईल. म्हणजेच 10 ग्रॅम खरेदी केल्यास 500 रुपयांचा त्वरीत फायदा होईल. गुंतवणूकदारांना सहामाही आधारावर निश्चित किंमतीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज दिले जाईल.

चोरीची भीती नाही

चोरट्यांना हे सोने चोरता येते नाही. कारण ते बॉंड स्वरुपात असते. गुंतवणूकदाराला सोने प्रत्यक्षरित्या साठवण्याची किंवा ठेवण्याची गरज नसते. याशिवाय, गुंतवणूकदाराला या योजनेतंर्गत बॉंड परिपक्तेवर सोन्याचा सध्याचा जो बाजार भाव सुरु असेल त्यानुसार परतावा मिळतो.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?