7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळणार गूडन्युज

प्रत्येक जण एकमेकाला नववर्षाच्या एडव्हान्स शुभेच्छा देत आहेत. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूडन्युज समोर आली आहे.

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळणार गूडन्युज
Follow us
| Updated on: Dec 31, 2022 | 11:17 PM

नवी दिल्ली : सर्वत्र सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. प्रत्येक जण एकमेकाला नववर्षाच्या एडव्हान्स शुभेच्छा देत आहेत. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूडन्युज समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 65 लाख कर्मचाऱ्यांना वर्षाच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्यात (7th Pay Commission DA Hike) येणार आहे. कामगार मंत्रालयाकडून नोव्हेंबर महिन्यातील एआयसीपीआय (AICPI Index) आकडे प्रसिद्ध केले आहेत. 2022 वर्षातील डिसेंबर महिन्याचे आकडे येणं बाकी आहे. मात्र जुलै ते नोव्हेंबरचे आकड्यानुसार हे स्पष्ट आहे की कर्मचाऱ्यांच्या पुढील डीए भत्त्यात किती वाढ मिळणार. (7th pay commission central government employee will give 4 percent hike on da from 1 january 2023)

ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये बदल नाहीच

कामगार मंत्रालयाकडून (Labour Ministry) 31 डिसेंबरला नोव्हेंबरचे आकडे प्रसिद्ध केलेल आहेत. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमधील आकडे जैसे थेच आहेत.ऑक्टोबरमध्ये आकड्यात 1.2 प्वाईंटने वाढ होऊन नवीन आकडा हा 132.5 इतका झाला आहे. तर नोव्हेंबरमध्येही हा आकडा 132.5 इतकाच आहे. कामगार मंत्रालयाच्या आकड्यानुसार नववर्षापासून 1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचं स्पष्ट आहे. मात्र डीएवाढीची घोषणा ही मार्चमध्ये करण्यात येणार आहे.

सप्टेंबरमध्ये आकडा किती?

ऑक्टोबरमध्ये एआयसीपीआय इंडेक्स पॉइंट्स 132.5 इतकं होतं. याआधी सप्टेंबर महिन्यात हेच इंडेक्स पॉइंट्स 131.3 इतके होतं. तर ऑगस्टमधील आकडा हा 130.2 इतका होता. जुलैपासून या पॉइंट्समध्ये सातत्याने वाढ होतेये. ऑक्टोबरनंतर नोव्हेंबरमध्ये या आकड्यांना ब्रेक लागला. एआयसीपीआय आकड्यांमध्ये सातत्याने वाढीमुळे जानेवारी 2023 मध्ये डीएत (Dearness allowance) वाढ होणार हे स्पष्ट आहे.

एकूण किती टक्के डीए होणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै महिन्यात 4 टक्क्यांनी वाढ झाल्याने एकूण महागाई भत्ता 38 टक्के झाला होता. त्यात आता पुन्हा 4 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर महागाई भत्ता 42 टक्क्यावर जाईल. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात चांगली वाढ होईल. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारकडून 7 व्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 वेळाच वाढ केली जाते. त्यानुसार जानेवारी आणि जुलै 2022 मध्ये भत्त्यात वाढीची घोषणा करण्यात आली आहे. आता जानेवारी 2023 मध्ये डीएची घोषणा केली जाणार आहे.

आकडे कोण प्रसिद्ध करतं?

एआयसीपीआय इंडेक्सच्या आधारावरच हे ठरतं की महागाई भत्त्यात किती टक्के वाढ होणार. कामगार मंत्रालयाकडून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी ऑल इंडिया कनझ्यूमर प्राईज इंडेक्सचे आकडे प्रसिद्ध केले जातात.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.