Aadhaar Free Update: फक्त 6 दिवस, मग संपणार डेडलाइन, महत्वाचे काम मोफत लगेच करुन घ्या

aadhar card update free: युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने 10 वर्षांपेक्षा जास्त जुने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा अनेक वेळा वाढवली आहे. यापूर्वी मोफत अपडेट करण्याची तारीख 14 मार्च होती. त्यानंतर ही तारीख वाढवून 14 जून 2024 करण्यात आली.

Aadhaar Free Update: फक्त 6 दिवस, मग संपणार डेडलाइन, महत्वाचे काम मोफत लगेच करुन घ्या
aadhar card
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 12:12 PM

शासकीय महत्वाचे दस्ताऐवज नेहमी अपडेट हवे असतात. त्यासाठी शासनाकडून विविध सवलती दिल्या जातात. आता प्रत्येक कामासाठी आवश्यक असणारे आधारसंदर्भात शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दहा वर्षांपेक्षा जास्त जुने असलेले आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सुविधा मोफत आहे. परंतु त्यासाठी डेडलाइन दिली आहे. ती डेडलाइन येत्या सहा दिवसांत संपणार आहे. आता फक्त 14 सप्टेंबरपर्यंत मोफत आधार अपडेट करता येणार आहे. त्यानंतर त्यासाठी पैसे लागण्याची शक्यता आहे.

14 सप्टेंबरपर्यंत करता येणार अपडेट

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI कडून 10 वर्षांपेक्षा जास्त जुने असलेले आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा दिली गेली आहे. 14 सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. यापूर्वी आधार अपडेट करण्याची डेडलाइन अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा डेडलाइन वाढवण्याची शक्यता नाही. यामुळे आता तुम्ही आधार अपडेट केले नाही तर त्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक वेळा वाढवली तारीख

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने 10 वर्षांपेक्षा जास्त जुने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा अनेक वेळा वाढवली आहे. यापूर्वी मोफत अपडेट करण्याची तारीख 14 मार्च होती. त्यानंतर ही तारीख वाढवून 14 जून 2024 करण्यात आली. पुन्हा तीन महिन्यांसाठी तारीख वाढवून 14 सप्टेंबर करण्यात आली आहे. ही डेडलाइन संपल्यानंतर शुल्क द्यावे लागणार आहे. 50 रुपये देऊन आधार अपडेट करता येणार आहे. मोफत सेवा केवळ myAadhaar Portal वर उपलब्ध आहे.

अशी करा प्रक्रिया

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
  • होमपेजवरील My Aadhaar पोर्टलवर जा आणि आधार क्रमांक-नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेल्या OTP सह लॉग इन करा.
  • यानंतर, तुमचे तपशील तपासा आणि तपशील योग्य असल्यास, योग्य बॉक्सवर टिक करा.
  • काही माहिती चुकीची आढळल्यास, ड्रॉप-डाउन मेनूमधून ओळखपत्र निवडा आणि ते ओळखपत्र अपलोड करा. जेपीईजी, पीएनजी आणि पीडीएफ दस्ताऐवजच अपलोड करता येते.
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.