AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar-Ration Card Linking : आधार – रेशन कार्ड लिंक करण्याची तारीख 30 जूनपर्यंत वाढविली, असे करा ऑनलाईन लिंक

आधारकार्डला रेशनिंग कार्ड लिंक करण्याची मुदत आता 31 मार्च वरून आता 30 जून 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीने करा लिंक

Aadhaar-Ration Card Linking : आधार - रेशन कार्ड लिंक करण्याची तारीख 30 जूनपर्यंत वाढविली, असे करा ऑनलाईन लिंक
aadhaarImage Credit source: socialmedia
| Updated on: Mar 27, 2023 | 7:02 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधार कार्डला रेशनकार्ड बरोबर लिंक करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे. आता 30 जून 2023 पर्यंत नागरिक आपल्या आधार कार्डला रेशनिंग कार्डशी लिंक करू शकणार आहेत. अन्न आणि नागरी वितरण मंत्रालयाने यासंदर्भातील नोटीफिकेशन जारी केले आहे. या आधी आधार कार्डला रेशन कार्डशी लिंक करण्याची शेवटची मुदत 31 मार्च 2023  अशी ठेवण्यात आली आहे. सरकारने ही मुदत वाढवित आता ती 30 जूनपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील कोट्यवधी जनतेला रेशनिंग कार्यालयलातून सबसिडीचे धान्य आणि इंधन पुरविले होते. पासपोर्ट आणि पॅन कार्ड सारखे रेशनकार्डला ओळखपत्र आणि निवासाचा पुरावा म्हणून वापरले जात आहे. काही ठिकाणी गरजू लोकांना स्वस्त धान्य मिळण्यात अडचणी होत आहेत, तर काही ठिकाणी रेशनकार्डधारक आपल्या वाट्यापेक्षा जास्त अन्नधान्य घेत आहे. जे पात्र नाहीत असेही लोक अशा सबसिडीचा बेकायदा लाभ घेत असल्याच्याही तक्रारी सरकारला आल्या आहेत. त्यामुळे जे खरोखरच पात्र नागरिक आहेत ते लाभापासून वंचित राहत आहेत. अशा घटनांना लगाम लावण्यासाठी आधारकार्डशी रेशनकार्डला लिंक करण्याची सरकारने योजना आहे.

आधारशी रेशनकार्ड कसे लिंक कराल पाहूया…

सर्वात आधी पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम यानी पीडीएस (PDS) च्या अधिकृत वेबसाई़डवर जा

आता मागितलेली माहीती उदा. आधार नंबर, राशन कार्ड नं. आणि रजिस्टर मोबाईल क्र. भरा

‘Continue’ बटन वर क्लिक करून पुढे जा

आता मागितलेली माहीती उदा. आधार नंबर, राशन कार्ड नं. आणि रजिस्टर मोबाईल क्र. भरा

‘Continue’ बटन वर क्लिक करून पुढे जा

आता आपल्या रजिस्टर मोबाईलवर OTP प्राप्त होईल

हा ओटीपी मागितल्या जागी भरा, आधारशी रेशनकार्ड लिंक करण्यासाठी क्लिक करा

Aadhaar-Ration offline Linking : आधारला रेशन कार्ड ऑफलाइन लिंक असे करा

पात्र रेशनकार्ड धारकाने आपल्या घरातील सर्व सदस्यांची आधार आणि रेशनकार्ड फोटोकॉपी झेरॉक्स काढावी

जर रेशनकार्डधारकाचे बॅंक खात्याशी आधार लिंक नसेल तर बॅंकेच्या पासबुकची फोटोकॉपी काढावी

कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो इतर कागदपत्रांची फोटोकॉपी रेशन कार्यालय, पीडीएस किंवा रेशन दुकानात जमा करावे

आधार डेटाबेस वॅलिड करण्यासाठी फिंगर प्रिंट आयडी द्यावी लागले

विभागाला दस्ताऐवज वितरीत केल्यानंतर तुम्हाला एसएमएस किंवा इमेलवर कळविले जाईल

पीडीएसशी संबंधित विभाग तुमची कागदपत्रे प्रोसेससाठी पाठवेल, आणि रेशनकार्डला आधारकार्डशी यशस्वी लिंक केल्यानंतर तुम्हाला सुचना मिळेल

या कागद पत्राची आवश्यकता

ओरिजनल रेशन कार्ड फोटोकॉपी

कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधारकार्डची फोटोकॉपी

कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डची फोटोकॉपी

बॅंक पासबुकची फोटोकॉपी

कुटुंब प्रमुखाचे दोन पासपोर्ट साइज फोटो

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?