Credit Card : क्रेडिट कार्डच्या नावाखाली बँक तुम्हाला लुटते का? मग शिकवा असा धडा

Credit Card : क्रेडिट कार्ड आडून आपली बँक आपल्याला गंडविते. त्याविरोधात दाद मागितल्यास त्यांना धडा बसतो. या प्रकरणात एसबीआय क्रेडिट कार्डला असाच धडा बसला.

Credit Card : क्रेडिट कार्डच्या नावाखाली बँक तुम्हाला लुटते का? मग शिकवा असा धडा
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 7:04 PM

नवी दिल्ली : देशात क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढत आहे. क्रेडिट कार्ड (Credit Card) हे ग्राहकांना फायदेशीर ठरते. तसेच ते कधी कधी मनस्ताप देणारे पण ठरते. मोठ्या बँकांच नाही तर अनेक छोट्या बँका पण या क्रेडिट कार्डच्या शर्यतीत आहेत. तुम्हाला आठवड्यातून एक ते दोन वेळा बँकांतून क्रेडिट कार्ड घेण्यासाठी फोन येत असेल. पण अनेकदा बँका क्रेडिट कार्डच्या अडून एक प्रकारे हप्ता वसूलीच करतात. चूक नसतानाही ग्राहकांकडून शुल्क, दंड वसूल करतात. अशाच एका प्रकरणात SBI Cards And Payment Services ला दणका बसला. ग्राहक आयोगाने बँकेच्या क्रेडिट शाखेला दंड बसवला.

इतका लागला दंड दिल्लीतील ग्राहक आयोगाने SBI Cards And Payment Services ला दणका दिला. या शाखेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला. पीटीआयच्या वृत्तानुसार, एसबीआय कार्डसविरोधात एका कार्डधारकाने तक्रार दाखल केली होती. एम. जे. अंथनी यांनी बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.

असा आहे बँकेचा प्रताप अंथनी यांनी या बँकेचे क्रेडिट कार्ड खरेदी केले होते. काही दिवसांनी हे कार्ड त्यांनी बंद केले. बँकेचा प्रताप इतका भयंकर आहे की, कार्ड बंद असतानाही त्यांना बँकेने क्रेडिट कार्ड वापराचे बिल पाठवले. नंतर हे बिल भरले नाही म्हणून दंड ठोठावला. दंडासहीत बिलाची रक्कम भरण्यासाठी त्यांना सातत्याने फोन करुन त्रास दिला.

हे सुद्धा वाचा

बँकेनेच केले होते कार्ड रद्द 9 एप्रिल 2026 पासून अंथनी यांनी क्रेडिट कार्डचा वापर बंद केला होता. रितसर क्रेडिट कार्ड बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. बँकेने त्यांना क्रेडिट कार्ड बंद केल्याचे, ते रद्द केल्याचे पत्र दिले. पण तरीही त्यांना 2946 रुपयांचे क्रेडिट बिल पाठविण्यात आले. बिल अदा केले नाही म्हणून विलंब शुल्क आकारण्यात आले. याप्रकाराला वैतागून अंथनी यांनी एसबीआयला धडा शिकविण्याचा निर्णय केला.

दंड भरण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी ग्राहक आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. सर्व पुरावे आणि युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर एसबीआयला दंड ठोठावला. SBI Cards And Payment Services ला दणका दिला. येत्या दोन महिन्यात 2 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तुम्हाला बँकेकडून असाच काही त्रास होत असेल. नाहकचा दंड, शुल्क आकारण्यात येत असेल तर त्याविरोधात तुम्ही ग्राहक आयोगाकडे दाद मागू शकतात. विशेष म्हणजे ग्राहक आयोगात तुमची लढाई तुम्हाला ही लढता येते. पुरावे सादर करुन युक्तीवाद करता येतो.

बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...