बँका देतात कुठल्याही गॅरंटीशिवाय कर्ज, जाणून घ्या प्री-अँप्रुव्हड कर्ज नेमके काय आहे?

| Updated on: Jul 03, 2021 | 11:35 PM

तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या कर्जाची ऑफर दिलेली असते. अशा प्री-मंजूर कर्जाच्या मागे अनेक अटी व शर्ती आहेत. (Banks offer loans without any guarantee, know exactly what is a pre-approved loan)

बँका देतात कुठल्याही गॅरंटीशिवाय कर्ज, जाणून घ्या प्री-अँप्रुव्हड कर्ज नेमके काय आहे?
बँका देतात कुठल्याही गॅरंटीशिवाय कर्ज, जाणून घ्या प्री-अँप्रुव्हड कर्ज नेमके काय आहे?
Follow us on

नवी दिल्ली : पूर्व-मान्यताप्राप्त कर्जाबद्दल (Pre-approved loan ) आपणास सर्व माहिती असणे आवश्यक आहे. “अभिनंदन, तुमची पूर्व मंजूर कर्जाची मर्यादा 1 लाख वरून 2 लाखांपर्यंत वाढली आहे.” बर्‍याच जणांना प्री-अँप्रुव्हड कर्जे देणारे असे संदेश येतात. कदाचित, तुम्हालादेखील असे मेसेज आले असतील. अशा ऑफर खूप आकर्षित असतात. कधीकधी आपण त्याकडे दुर्लक्ष केले असेल, परंतु काही वेळा अशा मेसेजवर तुमची नजर नक्कीच थांबेल. सुरुवातीला असे दिसते की, आपल्याला कोणत्याही हमीशिवाय कर्ज उपलब्ध होत आहे. तथापि, अशा प्रकरणात तुमचा क्रेडिट स्कोअर बँकांच्या सहानुभूतीपेक्षा अधिक महत्वाचा असतो. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या कर्जाची ऑफर दिलेली असते. अशा प्री-मंजूर कर्जाच्या मागे अनेक अटी व शर्ती आहेत. (Banks offer loans without any guarantee, know exactly what is a pre-approved loan)

प्री-मंजूर कर्ज म्हणजे काय?

पूर्व-मंजूर कर्ज म्हणजे तुमच्या क्रेडिट रेटिंगच्या आधारे देण्यात आलेली कर्ज ऑफर. प्रत्येक बँक स्वत:च्या विशिष्ट अटी व शर्तींच्या आधारे सामान्य लोकांना कर्ज देते. कार लोन, होम लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन इत्यादी स्वरूपात पूर्व-मंजूर कर्जाच्या ऑफर असू शकतात.

तुमची आर्थिक परिस्थिती महत्वाची

पूर्व-मंजूर कर्ज प्रत्येकास दिले जात नाहीत. कर्ज देण्यापूर्वी बँका तुमच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करतात. बँक तुमचा व्यवहार आणि क्रेडिट स्कोअरच्या आधारे अंदाज बांधतात. तुम्ही केलेले आधीचे क्रेडिट कार्ड पेमेंट्स आणि इतर व्यवहारांच्या आधारे बँका तुमच्या कर्ज परतफेड क्षमतेचा अंदाज लावतात. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला पूर्व-मंजूर कर्ज दिले जाते.

कोणत्याही बँकेचे बंधन नाही

प्री-मंजूर कर्जाचा अर्थ असा नाही की बँक तुम्हाला कर्ज देण्यास बांधील आहे. ती बँकेने दिलेली ऑफर असते. ही ऑफर दिली म्हणजे तुम्हाला कर्ज मिळेल, असे नाही. पूर्व-मंजूर कर्ज मिळविण्यासाठी तुम्ही कर्ज प्रक्रियेचे पूर्णपणे पालन करणे आवश्यक आहे. हे कर्ज सर्व निकषांचे पालन झाल्यानंतर दिले जाते.

कर्ज प्रक्रिया म्हणजे काय?

प्रत्येक कर्जाप्रमाणे बँकेच्या पूर्व-मंजूर कर्जाची प्रक्रिया जवळजवळ समान असते. कर्ज देण्यापूर्वी बँकांना काही सोपी आणि महत्वाची माहिती मिळते. गृह कर्जाच्या बाबतीत तुमच्या मालमत्तेचे मूल्यांकन देखील केले जाते. पूर्व-मंजूर कर्जाची ऑफर असणे हे कर्ज परतफेड करण्याची तुमची चांगली क्षमता दर्शवते. याचा अर्थ असा आहे की तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल आणि क्रेडिट स्कोअरबद्दल बँकेला आधीपासूनच कल्पना असते.

प्री-मंजूर कर्जाचे काय फायदे आहेत?

गृह कर्जाच्या बाबतीत कर्ज मिळण्यास जास्त वेळ लागत नाही. कारण बँकेकडे कर्जदाराच्या आर्थिक स्थितीबद्दल आधीपासून माहिती असते. यानंतर केवळ आपल्या मालमत्तेचे मूल्यांकन करण्याचे काम बाकी असते.

पूर्व-मंजूर कर्ज ऑफर सहसा बाजारातील प्रचलित व्याज दरावर आधारीत असते. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कमी व्याजामध्ये तेवढे कर्ज मिळू शकेल. या माध्यमातून तुम्हाला कमी ईएमआय द्यावा लागेल आणि तुमच्या खिशावर कमी भार पडेल.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

कर्ज घेणार्‍यास पूर्व-मंजूर कर्ज जारी होण्यापूर्वी एक संपूर्ण कागद पडताळणी आवश्यक असते. पूर्व-मंजूर कर्जासाठी काही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये ओळख पुरावा, राहण्याचा पुरावा, पॅनकार्ड, गेल्या सहा महिन्यांचे बँक खात्याचे स्टेटमेंट आणि मागील तीन वर्षातील आयकर विवरण इ. कुठलेही कर्ज घेण्याआधी नियम आणि शर्ती नीट वाचणे महत्वाचे आहे. (Banks offer loans without any guarantee, know exactly what is a pre-approved loan)

इतर बातम्या

ठाणे मनपाची धडक कारवाई सुरुच, दिवा, वर्तक नगरमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

लसीकरणात महाराष्ट्राची रेकॉर्डब्रेक कामगिरी सुरुच, दिवसभरात आठ लाख नागरिकांचे लसीकरण