AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7th pay commission latest news : केंद्रीय कर्मचाऱ्यांना डबल खुशखबर, एरियर आणि 3 % DA बाबत मोठी अपडेट

अलीकडेच, कामगार मंत्रालयाने AICPI ची आकडेवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये जून 2021 ची आकडेवारी 121.7 आहे. जून 2021 साठी निर्देशांकात 1.1 अंकांनी वाढ होत 121.7 वर गेला आहे. अशा परिस्थितीत महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवणे निश्चित मानले जाते.

7th pay commission latest news : केंद्रीय कर्मचाऱ्यांना डबल खुशखबर, एरियर आणि 3 % DA बाबत मोठी अपडेट
या सरकारी योजनेमध्ये 2 रुपये जमा करा आणि 36000 रुपये पेन्शन मिळवा
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 5:44 PM
Share

7th Pay Commission नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डबल खुशखबर आहे. कर्मचाऱ्यांना गेल्या दीड वर्षाच्या थकबाकीसह पुन्हा 3 टक्के डीए वाढ मिळण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये मंत्रिमंडळाने DA मध्ये 11 टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आणि त्याला जुलैच्या पगारासोबत क्रेडिटही करण्यात आले. यामध्ये दीड वर्षांपासून अडकलेला 11 टक्के महागाई भत्ता(Dearness allowance) जोडला गेला आहे. मात्र, दीड वर्षापासून थकीत असलेला डीए दिला नाही. याबाबत सरकारने थकबाकी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, कर्मचारी संघटना सातत्याने याची मागणी करत आहेत. तर जेसीएम सचिव (स्टाफ साइड) शिव गोपाल मिश्रा यांनीही थकबाकीसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले होते. सरकारशी बोलणी करून तोडगा काढण्यात येईल. (Big good news for central employees, big update about arrears and 3% DA)

डीए थकबाकी मिळणे कठीण

केंद्रीय कर्मचारी वाट पाहत असले तरी थकबाकीचा मार्ग आता कठीण झाला आहे. कॅबिनेट सचिवांच्या 26-28 जून रोजी झालेल्या बैठकीत यावर कोणताही निष्कर्ष निघाला नाही. तसेच, मंत्रिमंडळातही यावर कोणतीही चर्चा झाली नाही. याबाबत राज्यमंत्री आर के निगम म्हणाले की, ही मागणी सातत्याने सुरू आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या हिताचाही विचार करायला हवा. तर शिवगोपाल मिश्रा यांच्या मते, महागाई लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. तथापि, महामारीमुळे, सरकारलाही यावर निर्णय घेणे थोडे कठीण आहे. कर्मचाऱ्यांनाही हे समजते. अशा परिस्थितीत सरकारसोबत एक सुवर्णमध्ये साधला जाईल.

जून 2021 मध्ये डीए वाढणार

महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढवल्यानंतर आता जून 2021 च्या डीएबद्दल चर्चा सुरु आहे. एआयसीपीआय डेटा (All India consumer price index) वरून हे स्पष्ट झाले आहे की महागाई भत्त्यात पुन्हा एकदा 3 टक्के वाढ दिसून येते. अलीकडेच, कामगार मंत्रालयाने AICPI ची आकडेवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये जून 2021 ची आकडेवारी 121.7 आहे. जून 2021 साठी निर्देशांकात 1.1 अंकांनी वाढ होत 121.7 वर गेला आहे. अशा परिस्थितीत महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवणे निश्चित मानले जाते. महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढीसाठी, AICPI IW चा आकडा 130 अंकांचा असावा. परंतु, सध्या ते वाढून 121.7 वर पोहोचला आहे. आता जून 2021 मध्ये महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढू शकतो.

महागाई भत्ता 31 टक्के असेल

आकडेवारीवरून हे स्पष्ट आहे की महागाई भत्ता 31.18 टक्के असेल. पण, DA चे कॅल्क्युलेशन राऊंड फिगरमध्ये केले जाते. अशा परिस्थितीत, 31 टक्के डीए देय असेल. आतापर्यंत महागाई भत्ता 28 टक्के होता. जून 2021 मध्ये होणाऱ्या वाढीसह डीए आता 31 टक्के असेल. मात्र, त्याची घोषणा आणि पैसे कधी दिले जातील हे अद्याप स्पष्ट नाही. पण, सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबरच्या मध्यापर्यंत चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा आहे. (Big good news for central employees, big update about arrears and 3% DA)

इतर बातम्या

शेती करताना अडचण आलीय, एका फोनवर सोल्यूशन, कृषी वैज्ञानिक प्रॉब्लेम सोडवणार

झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेकडून उपाययोजना सुरु, घरोघरी जाऊन व्यापक सर्वेक्षण होणार

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.