शेती करताना अडचण आलीय, एका फोनवर सोल्यूशन, कृषी वैज्ञानिक प्रॉब्लेम सोडवणार

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत किसान कॉल सेंटरमधील प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एका फोनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मोदी सरकारने 14 किसान कॉल सेंटरची संख्या वाढवून 21 केली आहेत.

शेती करताना अडचण आलीय, एका फोनवर सोल्यूशन, कृषी वैज्ञानिक प्रॉब्लेम सोडवणार
प्रतिकात्मक फोटो

नवी दिल्ली: शेती करताना शेतकऱ्यांना अनेकदा समस्यांना सामोरं जावं लागंत. त्या समस्येवरील उपाय विचारण्यासाठी शेतकऱ्यांना आता कृषी अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत किसान कॉल सेंटरमधील प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एका फोनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मोदी सरकारने 14 किसान कॉल सेंटरची संख्या वाढवून 21 केली आहेत. कोणत्याही भागातील शेतकरी त्यांना फोन करून त्यांच्याच भाषेत माहिती मिळवू शकतात. या केंद्रातील तज्ज्ञ 22 भाषांमध्ये माहिती देतात. तीन महिन्यांत 10,91,237 शेतकर्‍यांनी शेतीविषयक शास्त्रीय सल्ला घेतला आहे.

किसान कॉल सेंटरचा टोल फ्री क्रमांक 1800-180-1551 आहे. शेतकरी या क्रमांकावर कॉल करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही. या 21 केंद्रांमध्ये बसलेले तज्ञ पदवीधर फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, रेशीमपालन, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय आणि जैवतंत्रज्ञानातील डॉक्टर आहेत. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार या शास्त्रज्ञांनी गेल्या तीन वर्षांत 1,74,67,074 शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर करणं आणि त्यांचं उत्पन्न वाढवणं हा यामागील उद्देश आहे.

किसान कॉल सेंटरचे फायदे

शेतकरी कोणत्याही दिवशी सकाळी 6:00 ते रात्री 10:00 दरम्यान किसान कॉल सेंटरच्या क्रमांकावर कॉल करू शकतात. जर शेतकऱ्यांना पिके आणि बियाण्यांशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर या ते किसान कॉल सेंटरवर कॉल करुन मदत घेऊ शकतात. आपण खते आणि कीटकनाशकांच्या वापराच्या प्रमाणाची माहिती देखील मिळवू शकतात. फळबाग, पशुवैद्यकीय आणि कृषी उत्पादनांच्या किंमतींबाबत देखील मदत केली जाते.

22 भाषांमध्ये मदत

किसान कॉल सेंटरमधील तज्ज्ञ हिंदी, मराठी, गुजराती, तेलगू, भोजपुरी, छत्तीसगढी, तामिळ आणि मल्याळम यासह 22 भाषांमध्ये माहिती देतात. शेतकऱ्यांनी केलेला फोन कॉल सेंटरवर उचलला गेला नाही तर नंतर किसान कॉल सेंटर वरून शेतकऱ्याला फोन केला जातो. किसान कॉल सेंटरमध्ये नोंदणी केल्यावर, एक मजकूर संदेश किंवा व्हॉइस संदेश देखील शेतकऱ्यांना पाठविला जातो.

इतर बातम्या

PM Kisan : पीएम किसान योजनेचा नववा हप्ता 9 ऑगस्टला जारी होणार, केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या शेतकऱ्यांना महत्वाचा संदेश

VIDEO: जळगावात समाजकंटकांचा उच्छाद, 2 एकर कपाशी उपटून टाकली, शेतकरी महिलेचा टाहो

Kisan Credit Card Kisan Call Ce Good news toll free number 1800 180 1551 for assistance

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI