AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan : पीएम किसान योजनेचा नववा हप्ता 9 ऑगस्टला जारी होणार, केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या शेतकऱ्यांना महत्वाचा संदेश

नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग करतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 9 वा हप्ता असेल.

PM Kisan : पीएम किसान योजनेचा नववा हप्ता 9 ऑगस्टला जारी होणार, केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या शेतकऱ्यांना महत्वाचा संदेश
किसान सन्मान योजनेचे संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 12:12 PM
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग करतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 9 वा हप्ता असेल. यावेळी सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,000 कोटी रुपये पाठवले जातील. परंतु या कार्यक्रमापूर्वी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक विशेष संदेश पाठवला आहे. शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकावे अशी, केंद्रीय कृषी मंत्र्यांची इच्छा आहे.

नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये”पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधतील. या संवादानंतर ते पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता जारी करतील. तुम्ही pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शन द्वारे या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. हा मेसेज तुम्हाला कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण आहे. “, असं नरेंद्र सिंह तोमर म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांना आतापर्यंत किती पैसे मिळाले?

पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये झाली. तेव्हापासून, 10.90 कोटी शेतकऱ्यांना 1,37,192 कोटी रुपये मिळाले आहेत. देशात पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे पाठवले जात आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम वाढवण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत.

अर्ज कुठे करायचा

पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास पात्र शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू आहे. तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर pmkisan.gov.in भेट देऊन स्वतः अर्ज करू शकता. यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची गरज नाही.

अर्जाची स्थिती कुठे पाहायची?

जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधीच अर्ज केला असेल. परंतु, आजपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, तर त्याची स्थिती जाणून घेणे खूप सोपे आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर भेट द्या. तिथे फार्मर कॉर्नरवर जाऊन, तुम्ही तुमचा आधार, मोबाईल आणि बँक खाते क्रमांक टाकून पैसे येण्याची स्थिती जाणून घेऊ शकता.

मोदी सरकारची सर्वात यशस्वी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजना जाहीर केली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 8 हप्त्यांमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. योजनेचा नववा हप्ता 9 ऑगस्टला जारी होत आहे.

इतर बातम्या:

जिथे सत्ता नाही तिथे राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता राबवतंय; संजय राऊतांचा घणाघाती हल्ला

तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात, जयंत पाटलांच्या हॉकी संघाला हटके शुभेच्छा

Union Agriculture Minister Narendra Singh Tomar send message to farmers to watch pm kisan scheme 9th installment release ceremony by Narendra Modi on tv

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.