Richest Indians List 2021: गौतम अदानींची रेकॉर्डब्रेक कमाई, अजीम प्रेमजींचा अंबानींना धोबीपछाड!

ब्लूमबर्गने अब्जाधीशांची क्रमवारी घोषित केली आहे. क्रमवारीनुसार अदानी यांची सध्याची संपत्ती 75.3 बिलियन डॉलर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कमाईत 45.1 डॉलरची भर पडली आहे. वर्ष 2021 वर्षात दुप्पट उत्पन्नाच्या वाढीसह अदानींना लखलाभ देणारं ठरलं.

Richest Indians List 2021: गौतम अदानींची रेकॉर्डब्रेक कमाई, अजीम प्रेमजींचा अंबानींना धोबीपछाड!
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 10:09 PM

नवी दिल्ली– कोविड प्रकोपामुळे अर्थचक्राची गती मंदावली होती. मात्र, अब्जाधीश भारतीयांच्या संपत्तीवर त्याचा परिणाम दिसून आला नाही. वर्ष 2021 मध्ये श्रीमंत भारतीयांच्या संपत्तीचा आलेख चढाच राहिला. उद्योगपती गौतम अदानी यांनी कमाईचा उच्चांक गाठत आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीना मागे टाकलं. वर्ष 2021 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी अव्वल ठरले आहेत. अदानींच्या खात्यावर तब्बल 41.5 बिलियन डॉलर कमाईची नोंद झाली आहे.

अदानींची कमाई एक्स्प्रेस:

ब्लूमबर्गने अब्जाधीशांची क्रमवारी घोषित केली आहे. क्रमवारीनुसार अदानी यांची सध्याची संपत्ती 75.3 बिलियन डॉलर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कमाईत 45.1 डॉलरची भर पडली आहे. वर्ष 2021 वर्षात दुप्पट उत्पन्नाच्या वाढीसह अदानींना लखलाभ देणारं ठरलं. एका टप्प्यावर अदानी यांच्या संपत्तीने 85 बिलियन डॉलरचा टप्पा पार केला होता. मात्र, शेअर बाजारात अदानी ग्रूपची कामगिरी खालावल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला.

प्रेमजींची अंबानींना धोबीपछाड:

ब्लूमबर्गच्या क्रमवारीनुसार, केवळ भारत नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी 89.7 बिलियन डॉलर संपत्तीचे धनी आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत 13 बिलियन डॉलरहून अधिक आहे. वर्ष 2021 मध्ये कमाईच्या बाबतीत विप्रोचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी यांनी अंबानींना मागे टाकले आहे. वर्ष 2021 च्या अखेरीस प्रेमजी यांची एकूण संपत्ती 41.2 बिलियन डॉलर नोंदविली गेली. मागील वर्षाच्या तुलनेत 15.8 बिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे.

दमानी सुसाट, नाडर आघाडीवर:

डिमार्टचे सर्वेसर्वा राधाकिसन दमानी यांच्यासाठी देखील वर्ष 2021 फलदायी ठरलं. संपत्तीत 9.51 बिलियन डॉलर वाढीसह दमानींच्या संपत्तीचा आलेख 24.4 बिलियन डॉलरवर जाऊन पोहोचला. वर्ष 2021 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत एचसीएसचे शिव नाडार पाचव्या क्रमांकावर आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत 8.40 बिलियन डॉलरच्या वाढीसह नाडर यांची संपत्ती 32.5 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे.

कुणाच्या संपत्तीत किती वाढ?

वर्ष 2021 अनेक अब्जाधीशांसाठी फलदायी ठरलं. अब्जाधीशांच्या संपत्तीत लाखो डॉलरची भर पडली.

नेमकी कुणाच्या संपत्तीत किती वाढ?

o सावित्री जिंदल (Savitri Jindal) 5.82 बिलियन डॉलर o कुमार मंगलम बिर्ला – 5.02 बिलियन डॉलर o सन फार्माचे दिलीप संघवी (Dilip Sanghvi) 4.28 बिलियन डॉलर o डीएलएफचे केपी सिंह (KP Singh) 3.61 बिलियन डॉलर o नायकाच्या फाल्गुनी नायर (Falguni Nayar) 3 बिलियन डॉलर

Corona | ज्या वेगानं तिसरी लाट येतेय, त्याच वेगानं ती ओसरणार, असा अंदाज तज्ज्ञांनी का वर्तवला?

शिवसेनेचं ‘हरवला आहे’, तर नितेश राणेंचं ‘गाडलाच’! तर नारायण राणेंच्या टीकेला मलिक आणि देसाईंचं जोरदार प्रत्युत्तर

Video | पोलिसांची चूक? अफवा की आणखी काही? वैष्णवदेवीत झालेली चेंगराचेंगरी नेमकी कुणामुळे?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.