Home : ड्रीम होमसाठी मोजा आणखी पैसा, या वस्तूचे भाव पोहचले गगनाला

| Updated on: Nov 06, 2022 | 2:53 PM

Home : सर्वसामान्यांचा आशियाना आता आणखी महाग झाला आहे.

Home : ड्रीम होमसाठी मोजा आणखी पैसा, या वस्तूचे भाव पोहचले गगनाला
घर बांधणे झाले महाग
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : येत्या काही दिवसात घर बांधणे (Home Construction) आणखी महाग होणार आहे. सिमेंट उत्पादक कंपन्यांनी (Cement Production Companies) सर्वसामान्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावण्याची योजना आखली आहे. त्यामुळे घर बांधण्यासाठी आता आणखी रक्कम मोजावी लागणार आहे.

सिमेंट उत्पादक कंपन्यांनी प्रत्येक सिमेंट बॅग मागे 10 ते 30 रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अंमलात आला तर सर्वसामान्यांना घर बांधण्यासाठी अधिक पैसा मोजावा लागणार आहे.

महागाईचा भडका उडाला आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य माणूस बेजार झाला आहे. त्याच्यावर आता सिमेंट भाव वाढीचा पुन्हा भार पडणार आहे. घर बांधणे आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होणार आहे.

हे सुद्धा वाचा

एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस् लिमिटेडच्या अंदाजानुसार, सिमेंट कंपन्या नोव्हेंबर महिन्यात प्रति बॅगमागे 10 ते 30 रुपयांची वाढ करणार आहे. या संस्थेच्या एका अहवालानुसार, ऑक्टोबर 2022 मध्ये प्रत्येक सिमेंट बॅगमागे सरासरी 3-4 दराची वृद्धी झाली.

महिना-दर-महिना(MoM) च्या आधारावर, पूर्व आणि दक्षिण भागात दरात 2-3 टक्के तर पश्चिम भारतात जवळपास एक टक्का वाढ करण्यात आली आहे. तर उत्तर आणि मध्य भारतात 1-2 टक्के घसरण झाली आहे.

या 22 नोव्हेंबर रोजी पासून सिमेंट कंपन्या सर्वच विभागात प्रति सिमेंट बॅगमागे 10-30 रुपये वाढ करण्याच्या तयारीत आहे. किंमतीत वृद्धीचा खुलासा येत्या काही दिवसात या कंपन्या करतील.

यंदा जोरदार पावसामुळे आणि त्यानंतरच्या सणासुदीमुळे ऑक्टोबर महिन्यातील बांधकामांवर परिणाम झाला. बांधकामाचा वेग कमी झाला. येत्या काही दिवसात बांधकाम क्षेत्रात पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे.

येत्या तिमाहीत किंमतीत वाढ होण्याची शक्यता, सिमेंटच्या किंमतीत झालेली वाढ, बांधकाम क्षेत्रात पुन्हा येणारी तेजी याचा परिणाम या उद्योगावर होण्याची शक्यता आहे.