Government Scheme : विवाहित महिलांना केंद्र सरकारचे आर्थिक पाठबळ, 6000 रुपयांचे अर्थसहाय्य, तुम्हाला मदत मिळाली का?

Government Scheme : विवाहित महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने योजना सुरु केली आहे..

Government Scheme : विवाहित महिलांना केंद्र सरकारचे आर्थिक पाठबळ, 6000 रुपयांचे अर्थसहाय्य, तुम्हाला मदत मिळाली का?
विवाहितांना अर्थसहाय्यImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 6:54 PM

नवी दिल्ली : विवाहित महिलांसाठी खूशखबर आहे. केंद्र सरकारने (Central Government) महिलांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना (Financial Aid) सुरु केली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात (Bank Account) 6000 रुपये जमा होणार आहे. परंतु, हा लाभ केवळ विवाहित महिलांना होणार आहे. हा लाभ कसा मिळेल, ते पाहुयात..

मातृत्व वंदना योजनेतंर्गत (PM Matritva Vandana Yojana) विवाहितेला ही मदत मिळणार आहे. योजनेनुसार, गर्भवती महिलेला केंद्र सरकारच्यावतीने आर्थिक सहाय्य देण्यात येते. त्यामुळे मातृत्व काळात महिलेला मदत मिळते.

जन्माला येणारे मुलं कुपोषित नसावे, ते निरोगी असावे यासाठी ही योजना मदत करते. त्यासाठी ही योजना अर्थसहाय्य करते. त्यामाध्यमातून महिलेला आर्थिक मदत मिळते. त्यामुळे महिलेला औषधांचा खर्च करता येतो.

हे सुद्धा वाचा

या योजनेत पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये गर्भवती महिलांना देण्यात येतात. तर शेवटच्या टप्प्यात बाळाच्या जन्मानंतर रुग्णालयात 1000 रुपयांची मदत देण्यात येते.

केंद्र सरकारकडून देण्यात येणारी ही मदत, गर्भवती महिलेच्या बँक खात्यात सरळ हस्तांतरीत करण्यात येते. या योजनेसाठी अर्ज करताना काही समस्या आल्यास हेल्पलाइन क्रमांक 7998799804 यावर संपर्क करता येईल.

योजनेसंबंधीची माहिती https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या अधिकृत लिंकवर मिळेल. त्यावर तुम्हाला सर्व तपशील मिळेल.  अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे जमा करावी यासंबंधीची सर्व माहिती या संकेतस्थळावर मिळेल.

या योजनेची वैशिष्ट्ये काय

गर्भवती महिलेचे वय 19 वर्षे असावे

या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागेल

6000 रुपये केंद्र सरकार तीन हप्त्यात बँक खात्यात हस्तांतरीत करते

या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2017 रोजी झाली

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.