AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPF Passbook : पासबुक नाही झाले अपडेट, तरी चिंता नको, EPFO ने केली मोठी घोषणा

EPF Passbook : ईपीएफओच्या सर्व्हरने यापूर्वी घोळ घातला होता. देशभरातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात किती रक्कम आहे ते कळत नव्हते. आता व्याजाबाबत चिंता वाढली आहे.

EPF Passbook : पासबुक नाही झाले अपडेट, तरी चिंता नको, EPFO ने केली मोठी घोषणा
| Updated on: Jun 03, 2023 | 4:56 PM
Share

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (Employees Provident Fund Organization) सर्व्हरने गेल्या काही दिवसात मोठा घोळ घातला होता. देशभरातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात किती रक्कम जमा आहे, ते कळत नव्हते. सर्व्हर डाऊन झाल्याने हा घोळ झाला होता. आता कित्येक दिवसांपासून कर्मचारी व्याजाची प्रतिक्षा करत आहेत. ईपीएफओच्या पासबुकमध्ये (EPFO Passbook) यासंबंधीची अपडेट प्राप्त होते. तसेच खात्यातून रक्कम काढली तरी खात्यात त्यासंबंधीची माहिती अपडेट होते. भारताच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयातंर्गत (Ministry of Labour and Employment) ईपीएफओ कार्यरत आहे. या खात्यातून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यातील जमा रक्कम, निवृत्ती वेतन आणि विमा योजनेची माहिती मिळते.

EPFO पासबुक कसे चेक करणार? पीएफ खात्यात केंद्र सरकार जशी व्याजाची रक्कम जमा करते, तेव्हाच ईपीएफ पासबुकमध्ये ही माहिती अपडेट होते. पासबुक कर्मचाऱ्यांना ईपीएफओच्या संकेतस्थळावर आणि मोबाईल एपवर तपासता येते. पासबुक बघण्यासाठी कर्मचाऱ्याकडे त्याचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (Universal Account Number) आणि पासवर्ड (EPFO Password) यांची गरज असते. याचा वापर करुन पासबुक बघता येते.

व्याजाचा तपशील नसेल तर काय होईल नुकसान? अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचे पासबुक अपडेट नसल्याने नुकसान होईल अशी भीती सतावत आहे. यासंबंधी ईपीएफओने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरुन माहिती दिली आहे. त्यानुसार, पासबुकमध्ये व्याज अपडेट करणे ही एक एंट्री प्रोसेस आहे. पासबुकमध्ये व्याज कोणत्याही तारखेला अपडेट झाले तरी त्याचा आर्थिक हितसंबंधावर कोणताही परिणाम होत नाही. आर्थिक वर्ष संपल्यानंतर केंद्र सरकार व्याजाची रक्कम जमा करते. तसेच व्याजदर लागू करण्यात उशीर झाला तरी, घोषणेच्या दिवसापासूनच ते गृहीत धरण्यात येते. त्याचा हिशोब तेव्हापासून मोजण्यात येतो. त्यामुळे सदस्यांचे कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे पासबुक अपडेट झाले नाही तरी काळजी करु नका.

अशी काढता येते रक्कम एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदार EPF मधील रक्कम काढू शकतो. पण जर नामनिर्दशीत व्यक्ती अथवा वारसदारांची नोंदणी झाली नसल्यास मग काय करता येईल? ही रक्कम बुडीत खात्यात जमा होते का? तर नाही. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या वारसांना मिळते. त्यासाठी काही कागदी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. कधी कधी न्यायालयातून त्यासाठीचा हुकूमनामा आणवा लागतो.

  • सर्वात अगोदर फॉर्म 20 मध्ये ईपीएफ सदस्य आणि रक्कमेवर दावा सांगणाऱ्यांनी तपशीलवार माहिती द्यावी
  • अर्ज जमा केल्यानंतर दाव्याच्या स्थितीविषयी एसएमएसद्वारे अपडेट अलर्ट देण्यात येतो
  • तुमच्या अर्जाची सध्यस्थितीविषयी ईपीएफओच्या वेबसाईटवर गेल्यास माहिती मिळते
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि दावा मंजूर झाल्यावर वारसदाराला मयत कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यातील रक्कम देण्यात येते. ही रक्कम वारसदाराच्या बँक खात्यात थेट जमा होते
  • हा अर्ज तुम्हाला नियोक्त्या, कंपनीच्या मार्फत करावा लागतो. ज्या ठिकाणी कर्मचारी काम करत होता. त्या कंपनीतून हा अर्ज ईपीएफओम कार्यालयाकडे पाठवावा लागतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.