Mutual Fund : विसरुन जा दुनियादारी, हे नियम जाम भारी, मोठी गुंतवणूक करेल करोडपती..

Mutual Fund : म्युच्युअल फंडातील हा फॉर्म्युला तुम्हाला झटपट श्रीमंत करु शकतो..

Mutual Fund : विसरुन जा दुनियादारी, हे नियम जाम भारी, मोठी गुंतवणूक करेल करोडपती..
व्हा करोडपतीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 7:59 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. काही वर्षांतच तुम्हाला कोट्यधीश (Crorepati) व्हायचे असेल तर हे स्वप्न तुम्हाला पूर्ण करता येऊ शकते. पण त्यासाठी मोठी गुंतवणूक (Investment) आणि एक फॉर्म्युला (Formula) तुमच्या उपयोगी ठरु शकतो. म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गुंतवणूक तुम्हाला 15 वर्षांतच करोडपती करु शकतो. पण त्यासाठी 15 अंकाचा एक फॉर्म्युला तुम्हाला सवयीचा करुन घ्यावा लागेल.

Share Market मध्ये सध्या तेजीचे सत्र असल्याने त्याचा फायदा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनाही मिळत आहे. निश्चित गुंतवणूक योजनेतून (SIP) गुंतवणूक करणे फायदेशीर ठरले आहे.  त्यामाध्यमातून दीर्घकालीन फायदा होतो.

तर या SIP च्या आधारे गुंतवणूकदाराला 15 वर्षांच्या गुंतवणुकीतून जोरदार परतावा मिळू शकतो. पण त्यासाठी आणखी 15 या अंकाचा आधार घ्यावा लागेल. तुम्हाला दर महा 15 हजारांची बचत करावी लागेल. ही बचत तुम्हाला करोडपती बनवेल.

हे सुद्धा वाचा

म्युच्युअल फंडातून जोरदार परताव्यासाठी गुंतवणूकदारांना 15 x 15 x 15 नियम(Rule) मदत करेल. या माध्यमातून तुम्हाला जोरदार परतावा मिळेल. त्याआधारे तुम्ही 15 वर्षांतच सहज कोट्याधीश झालेले असाल. हा फॉर्म्युला अनेक आर्थिक सल्लागार ही सांगतात.

म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरते. त्यामाध्यमातून चक्रवाढ व्याजाच्या आधारे गुंतवणूक लवकरच फायदेशीर ठरते. म्युच्युअल फंड कॅलक्युलेटरनुसार (Mutual fund calculator) मुळ रक्कम काही वर्षांतच अनेक पटीत परतावा देते.

जर एखाद्या व्यक्तीने 15 वर्षांकरीता 15 हजार रुपयांची दरमहा बचत केली तर त्याची एकूण गुंतवणूक 27 लाख रुपये होईल. त्यावर 15 टक्के कमीतकमी दरवर्षीचा परतावा गृहीत धरला तर ही रक्कम 74,52,946 रुपये होईल.

याचा सरळ अर्थ तुमचे 27 लाख रुपये 15 वर्षांनतर 1,01,52,946 रुपये होतील. तुम्ही कमी रक्कम गुंतवली तरी लखपती होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. पण त्यासाठी तुम्हाला नियमीत बचतीची सवय लावून घ्यावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.