AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ITR Filing Date Extended : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या शेवटची तारीख

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधी तुम्हाला आयकर https://www.incometax.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. तुमचा पॅन तपशील, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट केल्यानंतर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

ITR Filing Date Extended : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या शेवटची तारीख
तुम्ही दोन घरांचे मालक आहात का? आयकरात सूट मिळवण्यासाठी हे महत्त्वाचे नियम जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 8:20 PM
Share

ITR Filing Date Extended नवी दिल्ली : सरकारने इनकम टॅक्स रिटर्न(Income Tax Return) भरण्याची मुदत वाढवली आहे. आयकर भरणाऱ्यांना आता 31 डिसेंबरपर्यंत आयकर विवरणपत्र भरता येणार आहे. केंद्र सरकारकडून गुरुवारी सांगण्यात आले की आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सध्या ITR भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पर्यंत होती, ती 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (Extended deadline for filing income tax returns, know the deadline)

इन्कम टॅक्स इंडियाने ट्वीट करीत सांगितले आहे की, “आयकर रिटर्न(ITR) आणि आयकर अधिनियम, 1961 अंतर्गत मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी ऑडिट रिपोर्ट दाखल करताना करदात्यांनी नोंदवलेल्या अडचणी लक्षात घेऊन, सीबीडीटीने आयटीआर दाखल करण्याची तारीख आणि ऑडिट रिपोर्टच्या तारखा मूल्यांकन वर्ष 21-22 साठी वाढविण्यात आल्या आहेत.”

इनकम टॅक्स रिटर्न कसे भरावे?

– इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधी तुम्हाला आयकर https://www.incometax.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. तुमचा पॅन तपशील, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट केल्यानंतर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा.

– त्यानंतर ई-फाइल मेनूवर क्लिक करा आणि इन्कम टॅक्स रिटर्न लिंकवर क्लिक करा.

– आयकर रिटर्न पृष्ठावर पॅन ऑटो पॉप्युलेट होईल, येथे मूल्यांकन वर्ष निवडा, आता आयटीआर फॉर्म क्रमांक निवडा, आता तुम्हाला फायलिंग प्रकार निवडावा ज्यामध्ये मूळ / सुधारित रिटर्न निवडावे.

– यानंतर, आता सबमिशन मोड निवडा ज्यामध्ये ऑनलाईन तयारी आणि सबमिट निवडावे लागेल.

– नंतर Continue वर क्लिक करा. हे केल्यानंतर पोर्टलवर दिलेली मार्गदर्शक तत्वे वाचा. ऑनलाईन आयटीआर फॉर्ममध्ये रिक्त असलेल्या सर्व फिल्डमध्ये आपले तपशील भरा.

– यानंतर, पुन्हा कर आणि पडताळणी टॅबवर जा आणि तुमच्यानुसार सत्यापन पर्याय निवडा. पूर्वावलोकन आणि सबमिट बटणावर क्लिक करा, ITR मध्ये प्रविष्ट केलेला डेटा सत्यापित करा. शेवटी ITR सबमिट करा. (Extended deadline for filing income tax returns, know the deadline)

इतर बातम्या

शेती, फळपिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान द्या; राजेश टोपेंचे निर्देश

राणे कुटुंबाबाबत लूकआऊट सर्क्युलर, आता नितेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर, ठाकरे सरकारला इशारा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.