FD Interest Rate : “वाचाल तर कमवाल” ‘या’ बँकेकडून ग्राहकांना मिळतय एफडीवर अधिक व्याज

FD Interest Rate : वाचाल तर कमवाल''  'या' बँकेकडून ग्राहकांना मिळतय एफडीवर अधिक व्याज

RBI ने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णया घेतल्यानंतर कर्ज महाग झाले, तसे मुदत ठेवीवरील व्याजदर ही वाढले आहेत. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.

अजय देशपांडे

|

May 18, 2022 | 2:32 PM

मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करताय, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. RBI ने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्ज महाग झाले, तसेच मुदत ठेवीवरील व्याजदर ही वाढला आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसीने (HDFC Bank) ग्राहकांना मोठी खुशखबर दिली आहे. बँकेने बुधवारी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवीवरील व्याजदरात (FD Interest Rates) वाढ केली आहे. नवे दर 18 मे 2022 पासून लागू झाले आहेत. वैयक्तिक मुदतीच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. एचडीएफसी बँक 7 ते 29 दिवसांत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींवर 2.5 टक्के व्याज देत राहील. 30 ते 90 दिवसांत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेवींवरील व्याजदर 3 टक्के स्थिर राहील. 91 दिवस ते 6 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर सामान्यांना 3.50 टक्के व्याजदर मिळत राहील. त्याचबरोबर 6 महिने 1 दिवस ते 9 महिन्यांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या मुदत ठेवींवर (Fixed Deposit) बँक 4.40 टक्के व्याज देणार आहे.एचडीएफसी बँक 9 महिने, 1 दिवस आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधी पूर्ण करणाऱ्या एफडीवर 4.40 टक्के व्याज देत आहे, परंतु आता या कालावधीतील व्याजदर 4.50 टक्क्यांवर गेले आहेत. त्यात 10 बेसिस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे.

या ठेवींवर मिळेल अधिक व्याज

एचडीएफसी बँक 1 ते 2 वर्षांच्या कालावधी पूर्ण करणाऱ्या ठेवींवर 5.10 टक्के व्याजदर देत राहील. यापूर्वी 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या ठेवींवरील व्याज दर 5.20 टक्के होता, परंतु तो 20 बेसिस पॉईंटने वाढवून 5.40 टक्के करण्यात आला आहे. बँक आता 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे असा कालावधी पूर्ण करणाऱ्या ठेवींवर 5.60 टक्के व्याज देईल, जे पूर्वी 5.45 टक्के होते. त्यात 15 बेसिस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज

एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen Care FD) अतिरिक्त व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 5 वर्षांच्या ठेवींवर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल, तर बँकेच्या विशेष एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिक केअर एफडीमध्ये सध्याच्या 0.50 टक्के अतिरिक्त व्याजाव्यतिरिक्त 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 0.25 टक्के अधिक व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना सिनियर सिटिझन केअर एफडीमध्ये 30 सप्टेंबर 2022 पर्यंत गुंतवणूक करता येईल. पूर्वी सिनिअर सिटिझन केअर एफडीचा व्याजदर 6.35 टक्के होता, मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी तो आता 6.50 टक्के इतका वाढला आहे.

एचडीएफसी बँक व्याज दर 2022

7-14 दिवस – 2.50 %

15-29 दिवस – 2.50%

30-45 दिवस – 3.00%

46 – 60 दिवस – 3.00%

61- 90 दिवस – 3.00%

91 दिवस – 6 महीने – 3.50%

6 महीने 1 दिन – 9 महीने – 4.40%

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें