PF Withdrawal Easy Steps | सरकारी कर्मचारी (Government Servant) असो वा खासगी नोकरदार (Private Employees) कधी ना कधी पैशांची अडचण येतेच. अचानक मोठ्या रक्कमेची गरज पडते. अशा आपत्काळात तुम्हाला पीएफ खाते (Provident Fund) मदतीचा हात देऊ शकते. या खात्यात जमा होणारी रक्कम ही आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरते. ज्या संस्थेत तुम्ही काम करता ती वेतनात आणि त्याच्या वाटा असे मिळून पीएफ खात्यात रक्कम जमा करतात. नोकरदार वर्गासाठी ही रक्कम अचानक मोठ्या रक्कमेची गरज पडते, त्यावेळी उपयोगी पडते. कोरोना काळात तर सरकारने नियम शिथिल केल्यानंतर पीएफमुळे नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला. कोरोनाच्या दोन वर्षांत पीएफ खात्यातून सर्वाधिक रक्कम काढता आली. पीएफ खात्यावर सरकार दरवर्षी 8% व्याज (Interest Rate) देते. हा व्याजदर सातत्याने घसरत आहे. पण तरीही तो समाधानकारक आहे. 2022-23 मधील पीएफवरील व्याज लवकरच खात्यात जमा होणार आहे. तर आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला 72 तासात ही रक्कम काढता येते. कशी ते आपण पाहुयात.