AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Profile Password | SBI प्रोफाइल पासवर्ड विसरलात? या सोप्या पद्धतीने करा रिसेट

SBI Profile Password | बँकेचे व्यवहार करताना जपून करावे लागतात. त्यात प्रोफाइल पासवर्ड विसरलात तर ऑनलाईनची काही कामे थांबतात. तेव्हा एसबीआयचा प्रोफाइल पासवर्ड कसा रिसेट करायचे ते पाहुयात.

SBI Profile Password | SBI प्रोफाइल पासवर्ड विसरलात? या सोप्या पद्धतीने करा रिसेट
स्टेट बँक Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 26, 2022 | 7:23 AM
Share

SBI Profile Password | आता तुम्ही म्हणाल ऑनलाईन बँकिंगसाठी (Online Banking) किती हे पासवर्डचे झंझट. पण ही झंझट नाही तर तुमची बँकेतील ठेव सुरक्षित ठेवण्याची किल्ली आहे. ती चुकून दुसऱ्याच्या हाती लागली तर तुमचं खातं साफ झालं म्हणून समजा. तर प्रोफाइल पासवर्ड (Profile Password) ही तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तो खात्याला अधिक सुरक्षा देतो. तुमचा मोबाईल क्रमांक बदलायचा असेल, पेमेंटसाठी थर्ड पार्टी जोडताना, डीडी आणि थर्ड पार्टी व्यवहाराची मर्यादा ठरवताना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा बँकेचा ऑनलाईन लॉगिन पासवर्ड बदलतानाही प्रोफाइल पासवर्ड महत्वाचा ठरतो. आता विसराळूपणामुळे म्हणा वा लक्षात न ठेवल्यास तुम्ही पासवर्ड विसरलात तरी तो रिसेट करता येतो. SBI च्या अधिकृत संकेतस्थळानुसार, सुरक्षा वाढवण्यासाठी, ग्राहकांनी बहुभाषिक प्रतिमा आधारित व्हर्च्युअल की बोर्ड (MIVKB) वापरणे आवश्यक आहे.

पासवर्ड असा करता सेट

इंटरनेट बँकिंगसाठी लॉग इन करताना ग्राहकाला प्रोफाइल पासवर्ड सेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रोफाइल पासवर्ड लॉगिन पासवर्डपेक्षा वेगळा असतो. तो अक्षर, संख्या, विशिष्ट वर्ण यांचा एकत्रित समुह असतो. तो सहजासहजी चोरता वा क्रॅक करता येत नाही. यावेळी तुम्हाला प्रश्न निवडून त्याचे उत्तर देण्याचा पर्यायही निवडावा लागतो. भविष्यात तुम्ही तुमचा प्रोफाईल पासवर्ड विसरल्यास ओळख पडताळण्यासाठी या प्रश्नाचा वापर होतो.

प्रोफाइल पासवर्ड विसरलात?

तुम्ही प्रोफाईल पासवर्ड विसरल्यास तो रीसेट करता येतो. त्यासाठी पर्याय आहेत. एटीएम डेबिट कार्ड व्हॅलिडेशनद्वारे सेट केलेल्या संकेत प्रश्न आणि त्याची उत्तरे देऊन तुम्हाला स्वतःला प्रमाणित करणे आवश्यक आहे. तुम्हाला संकेत प्रश्न किंवा उत्तर आठवत नसेल आणि तुमच्याकडे एटीएम डेबिट कार्ड नसेल, तर तुम्ही पासवर्ड रीसेट करण्यासाठी तुमच्या शाखेत संपर्क साधू शकता.

प्रोफाईल पासवर्ड कसा रीसेट करायचा?

तुम्ही प्रथमच लॉग इन करताना संकेत प्रश्न किंवा उत्तर सेट केल्यास, SBI वेबसाइटनुसार पासवर्ड रीसेट करण्यासाठी तुम्ही संकेत प्रश्न उत्तर वापरू शकता.

संकेत प्रश्न उत्तर वापरून प्रोफाइल पासवर्ड रीसेट करण्यासाठी

1. प्रोफाइल क्लिक करा प्रोफाइल पासवर्ड विसरला. क्लिक केल्यावर खालील पर्याय समोर येतील. 1.संकेत प्रश्न उत्तर वापरणे 2.शाखेला भेट देऊन 3.एटीएम डेबिट कार्डद्वारे मंजूरी 2. Hint Question Answer वापरून पर्याय निवडा. 3. पहिल्यांदा लॉगिन करताना प्रोफाईल पासवर्डसाठी जो प्रश्न निवडला तो निवडा 4. या प्रश्नाचे उत्तर टाका. 5. सबमिट करुन क्लिक करा. प्रोफाइल पासवर्ड सेट करण्यासाठी नवीन पेज तयार होईल. त्यावर परवानगी मिळेल. 6. नवीन प्रोफाइल पासवर्ड टाका. 7. पासवर्ड पुष्टीसाठी पुन्हा प्रश्न निवडा आणि त्याचे उत्तर ही टाका. 8. सबमिट करुन क्लिक करा. तुमचा नवीन प्रोफाईल पासवर्ड तयार झाला.

Follow Us
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी