निम्म्याहून कमी किेमतीत ह्युंडाई i20 मिळवा… EMI चा पर्यायदेखील उपलब्ध

पेट्रोलवर चालणारे हे ह्युंडाईचे i20 मॉडेल असून ते सेकंड हँड कंडिशनमध्ये उपलब्ध आहे. ही कार दिल्ली आरटीओमध्ये रजिस्टर झालेली असून ती फर्स्ट ऑनर कार आहे. या कारवर इएमआयचाही पर्याय ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे

निम्म्याहून कमी किेमतीत ह्युंडाई i20 मिळवा... EMI चा पर्यायदेखील उपलब्ध
निम्म्याहून कमी किेमतीत ह्युंडाई i20
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

May 05, 2022 | 11:35 AM

कोरोना (Corona) काळात सर्वत्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. त्या काळात खासगी वाहनांना मोठी मागणी वाढली. अनेकांना नवीन चारचाकी घेणे शक्य नसल्याने त्या काळात बहुतेक लोकांनी सेकंड हँड कारचा पर्याय निवडला. एका रिपोर्टनुसार, कोरोना काळात सर्वाधिक सेकंड हँड (Second hand) कारची विक्री झाली आहे. भारतीय कार बाजारात कार्सचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यात जर तूम्ही प्रीमिअम सेगमेंटमधील हॅचबॅक (Hatchback) कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर यासाठी तूम्हाला 6 लाखांहून अधिकची रक्कम खर्च करावी लागू शकते. परंतु आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी एक अशी डिल घेउन आलो आहोत, ज्या माध्यमातून तुम्हाला याहून निम्मी म्हणजे केवळ 298999 रुपयांमध्ये ही कार खरेदी करता येणार आहे. ही एक व्हाइट सेगमेंटमधील कार आहे.

केवळ 60 हजार किलोमीटर रन

पेट्रोलवर चालणारे हे ह्युंडाईचे i20 मॉडेल असून ते सेकंड हँड कंडिशनमध्ये उपलब्ध आहे. ही कार दिल्ली आरटीओमध्ये रजिस्टर झालेली असून ती फर्स्ट ऑनर कार आहे. या कारवर इएमआयचाही पर्याय ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कार केवळ 60 हजार किलोमीटर रन झालेली आहे. या कारला एप्रिल 2010 ला रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. या कारची शेवटची सर्विसिंग एप्रिल 2022 मध्ये करण्यात आली आहे.

अशी आहेत फिचर्स

ही कार व्हाईट कलरमध्ये उपलब्ध आहे. यात अनेक चांगले फिचर्स देण्यात आले आहे. त्यात, हॅलोजन हेडलँपचा वापर करण्यात आला आहे. रिमोट सेंट्रल लॉकिंगचे फिचरदेखील देण्यात आले आहे. ह्युंडाई i20 च्या इंजीनबाबत बोलायचे झाल्यास, पेट्रोल इंजीन आहे. वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही कार 18.2 किलोमीटरचे मायलेज देत आहे. यात 45 लीटरची फ्यूअल कॅपिसिटी देण्यात आली आहे. या कारमध्ये पाच जण सहज प्रवास करु शकतात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें