AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today News | सोने 600 तर चांदीत 1600 रुपयांची घसरण, दहा दिवसांत दर कमी, सणाच्या साक्षीने साधा खरेदीचा मुहूर्त

Gold Silver Rate Today News | गेल्या दहा दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. सोन्याचे 600 तर चांदीचे दर 1600 रुपयांनी कमी झाले आहे.

Gold Silver Rate Today News | सोने 600 तर चांदीत 1600 रुपयांची घसरण, दहा दिवसांत दर कमी, सणाच्या साक्षीने साधा खरेदीचा मुहूर्त
आजचे सोन्या-चांदीचे दरImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 30, 2022 | 11:40 AM
Share

Gold Silver Rate Today | गेल्या दहा दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today News) चांगलीच घसरण झाली आहे. सोन्याचे 600 तर चांदीचे दर 1600 रुपयांनी कमी झाले आहे. 24 ऑगस्टनंतर सोन्याचे दर सातत्याने वाढले. तर चांदीही चमकली. भावात जवळपास 1000 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे खरेदीदारांचा(Gold Investor) उत्साह मावळला होता. पण 26 ऑगस्टनंतर पुन्हा दरात घसरण झाली. 21 ऑगस्ट रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,800 रुपये होता. 30 ऑगस्ट रोजी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,250 रुपये झाला आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 52,150 रुपये होता. आज हा दर 51,540 रुपये आहे. चांदीचा एक किलो भाव 55,600 रुपये होता. आज एक किलो चांदी, 54,000 रुपये आहे. त्यामुळे सणासुदीच्या(Festival) तोंडावर सोने-चांदी खरेदीचा चांगला मुहूर्त आहे.

सोन्याच्या किंमतीवर दबाव

अमेरिकन फेडरल बँकेने (American Federal Bank)पुन्हा चलनवाढीला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढीचा धोशा लावला आहे. अमेरिकन डॉलर आणखी मजबूत झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीवर (Gold Price) दबाव वाढला आहे. अमेरिकन डॉलर निर्देशांक गेल्या दोन दशकांच्या उच्चांकावर पोहचला आहे. त्याचा परिणाम जागतिक सराफा बाजारावर दिसून येत आहे. महागाईला आळा घालण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका तजवीज करत आहे. चलनवाढ कमी करण्यासाठी व्याजदर वाढीचा प्रमुख अजेंडा राबवण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक मंदीचाही सामना करावा लागत आहे.

राज्यातील चार शहरातील भाव

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,250 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,540 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,280 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,280 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 47,280 आहे तर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,570 रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 556 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय असतो फरक

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.  सोन्याच्या प्रतीनुसार त्याच्या किंमतीतही फरक पडतो. तसेच स्थानिक कराचाही समावेश होऊन ग्राहकांना भावानुसार रक्कम द्यावी लागते.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत