सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा झटका, 14 वर्षातील सर्वात खराब रिटर्न्स

याउलट Sovereign Gold Bond च्या माध्यमातून गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. केंद्र सरकारने एप्रिल 2021 पर्यंत Sovereign Gold Bond च्या माध्यमातून 25,702 कोटी रुपये जमा केले आहेत.

सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा झटका, 14 वर्षातील सर्वात खराब रिटर्न्स
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली: कोरोना संकटात गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. मात्र, तरीही गेल्या वर्षात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. 2020 हे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तितकेसे फलदायी ठरलेले नाही. या वर्षात सोन्यावरील गुंतवणुकीत गेल्या 14 वर्षांमध्ये सर्वात कमी परतावा मिळाला आहे.

गेल्या 14 वर्षांतील सोन्याचे दर पाहिल्यास ही बाब स्पष्ट होते. 16 जुलै 2007 ते 15 जुलै 2008 या कालावधीत सोन्याच्या किंमतीत 19.80 टक्क्यांची घट झाली. लेहमन ब्रदर्स बुडाल्यानंतर जागतिक मंदी आली होती. 2013 मध्ये अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने वित्तीय तरलता कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली होती.

याउलट Sovereign Gold Bond च्या माध्यमातून गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. केंद्र सरकारने एप्रिल 2021 पर्यंत Sovereign Gold Bond च्या माध्यमातून 25,702 कोटी रुपये जमा केले आहेत. फिजिकल गोल्डच्या तुलनेत सॉवरेन गोल्ड बाँडसनी 2.5 टक्के जास्त परतावा दिला आहे.

दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

Gold Price: पाच वर्षात सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार, एक तोळा सोन्याचा दर 90 हजारांवर?

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत घसरण, रेकॉर्ड स्तरापेक्षा 8,200 रुपयांनी स्वस्त

Published On - 8:13 am, Mon, 9 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI