सोन्यात गुंतवणूक करावी काय? तज्ज्ञांचा हा मोलाचा सल्ला नक्की कामा येईल

| Updated on: Feb 20, 2022 | 10:29 AM

सोन्यात गुंतवणुकीसाठी ‘सॉवरन गोल्ड बॉण्ड’ हा चांगला पर्याय आहे. सोने खरेदी करायचे असेल, तर ते नाणे, चिप किंवा बिस्किट या स्वरूपात बँकेतून खरेदी करा. सोने ज्वेलर्सकडून खरेदी करत असाल तर त्याची शुद्धता तपासा व बिल घ्यायला विसरु नका

सोन्यात गुंतवणूक करावी काय? तज्ज्ञांचा हा मोलाचा सल्ला नक्की कामा येईल
सोन्याचे आजचे दर
Image Credit source: tv9
Follow us on

ज्या वेळी म्युच्यूअल फंड, एसआयपी, बॉण्ड आदींमध्ये गुंतवणूक करण्याबाबत फारशी जनजागृती नव्हती त्या वेळी गुंतवणुकीचा विचार आला की, लोक पहिल्यांदा सोनं खरेदी करत असत. गुंतवणुकीसाठी सोन्याला सर्वोत्तम व आवडता पर्याय म्हणून स्वीकारले जात होते. परंतु काळ बदलला, आंतरराष्ट्रीय धोरणे बदलल्याने आता खरोखर सोन्यातील गुंतवणूक (Gold investment) फायद्याची आहे का? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. यासाठी एक उदाहरण पाहू या, शेतकरी राजपाल यांना या वर्षी चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांनी सोन्याच्या दागिन्यांमध्ये (jewelr) गुंतवणूक (invest) केली. त्या वेळी सोने 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दरात होते. दहा तोळ्याच्या दागिन्यांसाठी त्यांनी ‘मेकिंग चार्ज’ आणि जीएसटी जोडून सहा लाख रुपयांना ते खरेदी केले.

पत्नीच्या उपचारासाठी पैशांची गरज भासू लागल्याने ते सोने विकण्यासाठी ज्वेलर्सकडे गेले. त्याने त्या सोन्याची आताची किंमत सांगितल्यावर राजपाल यांना धक्काच बसला. वास्तविक त्यांनी खरेदी केलेला दागिना 20 कॅरेटचा होता, परंतु ज्वेलरने त्यांना तो 24 कॅरेटच्या भावाने विकाला होता. आता सोन्याची किंमत 48,000 रुपये आहे, त्यामुळे 20 कॅरेट सोन्याची किंमत 40,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली होती. नाईलाजाने राजपालने यांनी हे दागिने 3.60 लाख रुपयांना विकले. अशा पध्दतीने अनेक लोक दागिने खरेदी करतात आणि आपली बचत सोन्यात गुंतवतात, ज्याचा मोठा फटका त्यांना बसतो.

‘केडिया अॅडव्हायझरी’चे संस्थापक अजय केडिया म्हणतात, गुंतवणुकीसाठी सोने हा एक चांगला पर्याय आहे. परंतु ते सोने दागिन्यांच्या स्वरुपात नसावे. या गुंतवणुकीतून नफ्याची अपेक्षा करता येत नाही. काही गुंतवणूक वगळून काही ठराविक हेतुंसाठीच दागिने खरेदी करावेत, व तेही हॉलमार्क असलेले असावे असा सल्ला केडिया देतात. सोन्यात गुंतवणुकीसाठी ‘सॉवरन गोल्ड बॉण्ड’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्हाला गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचे असेल, तर ते नाणे, चिप किंवा बिस्किट या स्वरूपात बँकेतून खरेदी करावे. खरेदी बिल आवर्जुन घ्यावे.

बिल का आवश्यक आहे?

सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक केले असले तरी काही ज्वेलर्स हॉलमार्किंगशिवाय दागिन्यांची विक्री करत आहेत. काही लोक जीएसटी वाचवण्यासाठी बिलाविना दागिने खरेदी करतात. परंतु काही वेळा याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागत असते. म्हणूनच जेव्हाही तुम्ही दागिने खरेदी कराल तेव्हा त्याचे बिल निश्चितपणे घ्या. यातून तुम्हाला अनेक फायदे मिळतील. नंतर जेव्हा तुम्ही हे दागिने विकायला जाल तेव्हा ज्वेलर्स त्याच्या शुद्धतेच्या बाबतीत हेराफेरी टाळतात.

जर तुम्ही घराचा आणि सामानाचा विमा उतरवला असेल, तर चोरी किंवा इतर आपत्तीच्या बाबतीत तुम्ही त्यावर नुकसान भरपाईचा दावा करू शकता. विमा कंपन्या बिलाशिवाय दावा स्वीकारत नाहीत. हीच परिस्थिती बँक लॉकर्सवर लागू होते. याशिवाय, बिलासह खरेदी केलेले दागिने सहसा आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये जप्त केले जात नाहीत. म्हणूनच दागिने खरेदी करताना स्वस्त आणि जीएसटी वाचवण्याच्या लोभापायी नुकसान करुन घेउ नका.

संबंधित बातम्या : 

नोकरी बदलली तरी जुने सॅलरी अकाउंट सुरुच, ही बातमी तुमच्यासाठी, अन्यथा बसेल भुर्दंड

कोविडमध्ये दुनिया त्रासात असताना भारतात वाढली श्रीमंतांची संख्या, वाचा सर्वेक्षणाच्या या खास गोष्टी!