कोविडमध्ये दुनिया त्रासात असताना भारतात वाढली श्रीमंतांची संख्या, वाचा सर्वेक्षणाच्या या खास गोष्टी! 

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 19, 2022 | 12:13 PM

भारतामध्ये (India) झालेल्या एका सर्वेक्षणाने सर्वांनाच एक मोठा धक्का दिला आहे. कोरोनामुळे (Covid 19) जवळपास सर्वच देशांचे दिवाळे निघाले आणि प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती पूर्णपणे विस्कळीत झाली. मात्र, हुरुनच्या रिपोर्टनुसार कोविडच्या काळात भारतात श्रीमंतांच्या संख्येत वाढ झाली आहे.

कोविडमध्ये दुनिया त्रासात असताना भारतात वाढली श्रीमंतांची संख्या, वाचा सर्वेक्षणाच्या या खास गोष्टी! 
भारतामधील श्रीमंत लोकांची संख्या वाढली

मुंबई : भारतामध्ये (India) झालेल्या एका सर्वेक्षणाने सर्वांनाच एक मोठा धक्का दिला आहे. कोरोनामुळे (Covid 19) जवळपास सर्वच देशांचे दिवाळे निघाले आणि प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती पूर्णपणे विस्कळीत झाली. मात्र, हुरुनच्या रिपोर्टनुसार कोविडच्या काळात भारतात श्रीमंतांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, स्वत:ला आनंदी समजणाऱ्या अशा करोडपतींच्या संख्येत घट झाली आहे. तज्ञांच्या मते, कोविडदरम्यान खर्च करण्याबाबत सावध भूमिका घेण्यासह अर्थव्यवस्थेत तीव्र पुनर्प्राप्ती दरम्यान गुंतवणूक (Investment) मूल्यात वाढ झाल्याचा फायदा करोडपतींना झाला आहे.

भारतामध्ये श्रीमंतांची संख्या वाढण्याची कारणे! 

– 2021 मध्ये कोविड-19 महामारीमुळे, भारतात ‘डॉलर मिलियनरी’ म्हणजेच सात कोटी रुपयांहून अधिक वैयक्तिक संपत्ती असलेल्या व्यक्तींची संख्या 11 टक्क्यांनी वाढून 4.58 लाख झाली आहे. हुरुनच्या अहवालानुसार 2026 पर्यंत भारतातील ‘डॉलर मिलियनरी’ची संख्या 30 टक्क्यांनी वाढून सहा लाखांवर जाईल.

– सर्वेक्षणानुसार, ‘डॉलर मिलियनरीपैकी एक चतुर्थांश लोकांकडे त्यांची आवडती कार मर्सिडीज-बेंझ आहे आणि ते दर तीन वर्षांनी त्यांच्या कार बदलतात.

– अहवालानुसार, मुंबईत सर्वाधिक 20,300 ‘डॉलर मिलियनरी’ आहेत. त्यापाठोपाठ कोलकात्यात 10,500 ‘डॉलर मिलियनरी’ कुटुंबे आहेत. सर्वेक्षण केलेल्या दोन तृतीयांश डॉलर मिलियनरीनी सांगितले की ते त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यास प्राधान्य देतील, यूएस ही त्यांची पहिली पसंती आहे.

भारतात श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये मोठी दरी

अशा 350 श्रीमंत लोकांच्या मुलाखतींच्या आधारे या सर्वेक्षणात असे आढळून आले की, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात स्वत:ला आनंदी मानणाऱ्या लोकांची संख्या 2021 मध्ये 66 टक्क्यांवर घसरली, जी एका वर्षापूर्वी 72 टक्के होती. म्हणजेच लोक पूर्वीपेक्षा अधिक दबावाखाली आहेत. हुरुन अहवालाचे हे निष्कर्ष अशा वेळी आले आहेत. जेव्हा भारतात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढत्या असमानतेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच आलेल्या ऑक्सफॅमच्या अहवालातही या विषमतेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

Petrol Diesel Prices Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला, पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता!

Gold Rate | शेअर बाजारात अस्थिरता, मग सोन्याचे दरही वाढलेच की.. पहा आजचे दर!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI