AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Prices Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला, पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता!

देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. मात्र, रूस आणि युक्रेनमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहिला मिळते आहे. सध्या भारतामध्ये (India) काही दिवस दर स्थिर राहतील असे सांगितले जात आहे.

Petrol Diesel Prices Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला, पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता!
| Updated on: Feb 19, 2022 | 9:29 AM
Share

मुंबई : देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. मात्र, रूस आणि युक्रेनमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहिला मिळते आहे. सध्या भारतामध्ये (India) काही दिवस दर स्थिर राहतील असे सांगितले जात आहे. मात्र, एकदा उत्तर प्रदेश, पंजाबच्या निवडणूका झाल्या की, भारतामध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष: मार्च ते एप्रिलदरम्यान भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील.

पाहा आजचे तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर 

आज मुंबईमध्ये पेट्रोल 109.98 प्रतिलीटर, तर डिझेल 94.14 प्रतिलीटर मिळेल, दिल्लीमध्ये पेट्रोल 95.41 लीटर, तर डिझेल 86.67 लीटरप्रमाणे मिळेल. कोलकत्तामध्ये पेट्रोल 104.67 लीटर, तर डिझेल 89.79 प्रतिलीटर मिळेल. चेन्नईमध्ये पेट्रोल 101 लीटर तर, डिझेल 91.43 मिळेल. गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने भारतामध्येही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भारताने मुक्त बाजारपेठेचे धोरण स्वीकारल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि परदेशी एक्स्चेंजच्या दरांनुसार भारतात इंधनाचे दर निश्चित केले जातात.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या : 

Good news ! आयटी क्षेत्रात मार्चपर्यंत ३.६ लाख नवीन लोकांना रोजगार

ऑनलाइन कर्ज घेताना सावधगिरी बाळगा, फसवणूक टाळण्यासाठी या पद्धतींचा वापर करा

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली