AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TODAY GOLD,  Silver PRICE : सोन्याच्या भावात घसरण सुरूच, आज पुन्हा सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

सोन्याच्या दरात गेल्या तीन आठवड्यापासून सातत्याने घसरण सुरूच आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचे दर 0.34 टक्के तर चांदी 0.13 टक्क्यांनी स्वत झाली आहे.

TODAY GOLD,  Silver PRICE : सोन्याच्या भावात घसरण सुरूच, आज पुन्हा सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर
आजचे सोन्याचे दर
| Updated on: May 04, 2022 | 12:22 PM
Share

TODAY GOLD, Silver PRICE : आज पुन्हा एकदा सोने (GOLD), चांदीच्या दरात (GOLD, Silver PRICE) घसरण पहायला मिळत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार (MX) आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्या मागे 0.34 अर्थात 176 रुपयांची तर चांदीच्या दरात 0.13 टक्के 86 रुपयांची घसरण झाली आहे. आज 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,430 रुपये असून, चांदीचे दर 62 हजार 700 रुपये प्रति किलो इतके आहेत. आंतराराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने चढ उतार सुरू आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. गेल्या दीड महिन्यापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. याचा थेट परिणाम हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होताना दिसत येत आहे. जागतिक स्थरावर सोन्याच्या मागणीत घट झाल्याने देशात सोन्याचे दर स्वस्त होताना दिसत आहेत.

राज्याच्या प्रमुख शहरातील भाव

मल्टी कमोडिटी एक्सचेंजनुसार आज राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47200 रुपये इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51510 रुपये एवढा आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47280 रुपये एवढा असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51590 रुपये एवढा आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47280 तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51590 इतका आहे. दुसरीकडे आज चांदी देखील स्वस्त झाले असून, चांदीचा दर प्रति किलो 62 हजार 700 रुपये इतका आहे. सोन्याचे दर दिवसातून दोनदा जाहीर होतात. तसेच सोन्याचे दर हे सोन्याचा दर अधिक दागिने घडणावळीचा खर्च यावर अवलंबून असल्याने भावात तफावर आढळून येते .

गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण चालू आहे. तीन आठवड्यांपूर्वी 24 कॅरट सोन्याचे दर हे प्रति तोळा 54 हजारांपेक्षा अधिक होते. मात्र तीनच आठवड्यात सोन्याचे दर 51हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असल्यामुळे गुंतवणूकदारांचा गोधळ उडाल्याचे पहायला मिळत आहे. सोन्याचे दर कमी होत असल्याने सोन्यातील गुंतवणूक देखील कमी झाली आहे.

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.