GOOGLE PAY CREDIT CARD: आता स्वॅप करा गूगल पे क्रेडिट कार्ड, अप्लाय करा अन् शॉपिंगचा आनंद लुटा

| Updated on: Apr 21, 2022 | 6:38 AM

गूगल पेने आपल्या ग्राहकांसाठी खास ही सेवा उपलब्ध केली आहे. गूगल पेने अन्य बँकांसोबत सहकार्यात्मक भागीदारी करून ग्राहकांना नवी भेट उपलब्ध करुन दिली आहे.

GOOGLE PAY CREDIT CARD: आता स्वॅप करा गूगल पे क्रेडिट कार्ड, अप्लाय करा अन् शॉपिंगचा आनंद लुटा
कामाची बातमी...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : तुम्ही ‘गूगल पे’चे (GOOGLE PAY) नियमित वापरकर्ते असाल तर बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही मोबाईल फोनच्या माध्यमातून खरेदीसाठी गूगल पेच्या माध्यमातून पैसे पाठवत होतात. खरेदीनंतर एका क्लिकवर पेमेंटही करत होता. आता अन्य बँकाप्रमाणे तुम्ही गूगल पेचे क्रेडिट कार्ड (GOOGLE PAY CREDIT CARD) बनवू शकतात. ‘गूगल पे’ने आपल्या ग्राहकांसाठी खास ही सेवा उपलब्ध केली आहे. गूगल पेने अन्य बँकांसोबत सहकार्यात्मक भागीदारी करून ग्राहकांना नवी भेट उपलब्ध करुन दिली आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार गूगल पे क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करू शकतात आणि लोन वरही खरेदीचा मनमुराद आनंद लुटू शकतात. गूगल पे द्वारे नव्या सेवेसाठी अनेक बँकासोबत सहकार्यात्मक भागीदारी करण्यात आली आहे.

तुम्ही ज्या बँकेचे क्रेडिट कार्ड स्विकारल त्या बँकेच्या खात्यातून पैसे वजा केले जातील. ट्रान्झॅक्शन गूगल पेच्या माध्यमातून होईल. मात्र, पैसे कार्डमधून कपात केले जातील.

गूगल पे क्रेडिट कार्ड साठी कसे अप्लाय कराल?

  1. • गूगल पेच्या मनी सेक्शन मध्ये जा आणि ‘क्रेडिट कार्ड’ बटनावर क्लिक करा
  2. • तुम्हाला कार्डचे एकाधिक लाभ दिसतील. कार्डचे सर्व लाभ काळजीपूर्वक वाचा.
  3. • आता तुम्ही ‘अप्लाय करा’ वर क्लिक करा
  4. • तुमती वैयक्तिक माहिती तपासा
  5. • क्रेडिट कार्डच्या अटी व शर्ती वाचून सबमिट बटनावर क्लिक करा
  6. • तुम्ही विनंती केलेली बँक सर्व खातरजमा करुन कार्ड जारी करेल

क्रेडिट कार्डवरुन पेमेंटच्या स्टेप्स

  1. • तुमच्या मोबाईलवर गूगल पे उघडा
  2. • तुमचे प्रोफाईल, बँक खाते आणि कार्ड वर टॅप करुन कार्ड जोडा
  3. • कार्डचा तपशील काळजीपूर्वक भरा
  4. • सेव्ह करा वर टॅप करा
  5. • नियम व अटींचा स्वीकार करा
  6. • तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून प्राप्त ओटीपी टाकून प्रमाणित करा
  7. • नव्या कार्ड समोर सक्रिय असे नमूद असेल. तिथे टॅप करा
  8. • तुम्हाला कन्फर्मेशन साठी विचारणा करण्यात येईल. सर्व बाबींची खात्री करून टॅप करा

संबंधित बातम्या :

UPI Payment : एकाच दिवशी 10 कोटींचा व्यवहार, तर महिनाभरात 2.5 अरबोंचा टप्पा पार, युपीआय पेमेंट अ‍ॅप कंपन्यांमध्ये स्पर्धा भडकणार

टाटा समुहाकडून लवकरच UPI अ‍ॅप लाँच; Google Pay आणि Phone Pe ला देणार जोरदार टक्कर

UPI पेमेंट करताना रहा सावधान, नाहीतर व्हाल कंगाल; सुरक्षीत पेमेंट हीच खात्यातील रकमेची हमी