UPI पेमेंट करताना रहा सावधान, नाहीतर व्हाल कंगाल; सुरक्षीत पेमेंट हीच खात्यातील रकमेची हमी 

UPI पेमेंट करताना सावधगिरी बाळगणे आणि खात्रीशीर उपाय योजना करणे आवश्यक आहे. नाहीतर तुमच्या खात्यातील रक्कम गेलीच म्हणून समजा. ऑनलाईन फिशिंगचे शिकार व्हायचे नसेल तर पेमेंट अ‍ॅप वापरापूर्वी काही सुरक्षीत उपायांची माहिती करुन घेणे आवश्यक आहे. 

UPI पेमेंट करताना रहा सावधान, नाहीतर व्हाल कंगाल; सुरक्षीत पेमेंट हीच खात्यातील रकमेची हमी 
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 20, 2021 | 10:33 AM

नवी दिल्ली:  गेल्या चार ते पाच वर्षांत भारत कॅशलेस (Cashless) अर्थव्यवस्थेकडे वेगाने धावतोय. डिजिटल आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. स्मार्टफोन आणि डिजिटल अ‍ॅपमुळे ही क्रांती होत आहे. अगदी काही सेंकदात  कॅशलेस व्यवहार पूर्ण होतात. देशभरात एकाच सेकंदात लाखो व्यवहार केले जात आहेत. या व्यवहाराचे जसे फायदे आहेत, तसे धोकेही वाढले आहेत. हायटेक चोरांनी शिरकाव केल्याने डिजिटल पेमेंटमुळे खात्यातील रक्कमेचा सफाया झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

सगळ्यांना माहिती आहे की, ऑनलाईन देवाण-घेवाण वाढल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. गल्लीतील किराणा दुकान असू द्या की, गल्लीत येणारा भाजीविक्रेता, कोप-यावरील चहा विक्रेता असू द्या की मोठे मॉल आणि चौका-चौकात थाटलेल्या होलसेल शॉपी, गिफ्ट शॉपी, ऑनालाईन पेमेंटची सगळीकडे सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल काढा, अ‍ॅपच्या सहाय्याने क्यूआर कोड (QR code ) स्कॅन करा आणि पुढच्या काही स्टेप झाल्या की समोरच्याच्या बँक खात्यात रक्कम जमा. इतका सोप्पा व्यवहार झाला आहे. परंतु तुम्ही कोणतेही डिजिटल पेमेंट अ‍ॅपचा वापर करत असाल जसे की, गुगल पे, फोन पे, पेटियम ( Google Pay, Phone Pay, Paytm) तर जेवढ्या सरलतेने तुम्ही रक्कम पाठवू शकता, मात्र यामध्ये चुका झाल्यास तेवढ्याच तत्परतेने तुमच्या बँकेतील रक्कमेचा सुपडा साफ होईल. तुम्हाला कंगाल व्हायला सेकंदाचाही अवधी लागणार नाही. त्यामुळे पेमेंट करताना या चुका तुम्ही करु नका.

कोणालाही UPI अ‍ॅड्रेस शेअर करु नका

अनेकदा ग्राहक या चुका करतात आणि पायावर धोंडा पाडून घेतात. त्यामुळे चुकून ही चूक करु नका. तुमच्या UPI अकाऊंटचा अ‍ॅड्रेस सुरक्षित ठेवा. कधीही UPI अ‍ॅड्रेस कोणासोबत शेअर करु नका. तुमचा UPI अ‍ॅड्रेस हा फोन क्रमांक, क्युआर कोड, वा व्हर्चुअल पेमेंट अ‍ॅड्रेस (Virtual Payment Address) यामधील एक अथवा त्यांच्या एकत्रिकरणाचा भाग असू शकते. तुम्हाला पेमेंट करताना अथवा व्यवहारासाठी कोणालाही  UPI अकाऊंटपर्यंत पोहचवू देऊ नका,

स्क्रीन लॉक सेट करा

स्क्रीन लॉक (Screen Lock) हा कधीही दुस-याला सहज अंदाज बांधता येईल असा नको. याबाबत तुम्ही अधिक सतर्क रहायला हवे. अत्यंत सोपा पासवर्ड अथवा पिन सेट करु नका. त्यामुळे तगडा पासवर्ड तुम्ही टाकायला हवा आणि तो ही कोणाला शेअर करु नका. सर्वच अ‍ॅपसाठी तुम्हाला असा मजबूत स्क्रीन लॉक असणे आवश्यक आहे. जर तुम्ही गुगल पे, फोन पे, पेटियम अशा अपचा वापर करत असाल तर स्क्रीन लॉकसाठी मजबूत पीन सेट करा. पीन सेट करताना कधीही  जन्मतारीख, त्याचे वर्ष, तुमचा मोबाईल क्रमांक असा सहजासहजी ट्रॅक करता येईल असा पीन टाकू नका. हा पीन ही कोणासोबत शेअर करु नका. शंका असल्यास तो बदला.

अनव्हेरिफाईड लिंक वा कॉलला महत्व देऊ नका

सध्या डिजिटल फिशिंगचा जमाना आहे. त्यासाठी सायबर चोरटे अनेक ट्रीक काढतात. तुम्हाला फसविण्यासाठी जाळे विणतात. त्यासाठी हॅकर नेहमीच दोन ट्रीक जास्त वापरतात. एक म्हणजे तुम्हाला अनव्हेरिफाईड लिंक (Unverified Link) अथवा फेक कॉल (Fake call) करतात. या लिंक एखाद्या बँकेशी, मोठ्या ब्रँडशी संबंधित सेकंतस्थळासारख्या समान दिसतात. मात्र त्या अधिकृत नसतात. त्या लिंकवर क्लिक करु नका. लिंकवर गेल्यास केवायसी अपडेट करा, अ‍ॅप डाऊनलोड करा असे जाळ्यात अडकविण्यात येते आणि त्यामाध्यमातून बँकेतील रक्कम चोरण्यात येते. अमूक-तमूक बँकेतून बोलतो, केवायसी अपडेट करा, तुमचे खाते अपडेट नाही अशा काही थापा मारुन तुमच्या खात्यातील रक्कम वळविण्यात येते.

एकपेक्षा अधिक अ‍ॅपचा वापर करु नका

अनेकदा रिवार्डच्या मोहात अथवा त्वरीत पेमेंट व्हावे या विचारात अनेकदा आपण एकापेक्षा अधिक पेमेंट अपचा वापर करतो. परंतू अनेकदा सल्लागार असे करण्यास मनाई करतात. हा ही एक मोठा धोका असू शकतो. जे अ‍ॅप तुम्हाला सर्वात चांगला फायदा आणि सेवा देत असेल त्याचा जास्तीत जास्त वापर करा. अधिक प्रमाणात  अ‍ॅपचा वापर केल्यास ट्रान्झॅक्शन हिस्टरी शोधण्यात सर्वांचा वापर करावा लागतो. तसेच सुरक्षेच्या दृष्टिनेही ते योग्य नसल्याचे सल्लागारांचे म्हणणे आहे.

UPI अ‍ॅप नियमीतपणे अपडेट करा

UPI अ‍ॅप सक्षमपणे अपडेट होत असतात. आपण सातत्याने त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अ‍ॅपमध्ये बग आल्यास, एखादी नवी सुविधा देण्यास अथवा नवे फिचर आणले असेल तर अ‍ॅप अपडेट करणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला त्या सेवेचा लाभ मिळू शकतो. अपडेट केल्यानंतर त्या सुविधा ग्राहकाला मिळतात. तसेच अकाऊंटही सुरक्षीत राहते.

संबंधित बातम्या 

Labor Law: 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी, पगारही हातात कमी पडणार, नव्या कामगार कायद्यात नवं काय, जूनं काय?

गोल्ड लोनच्या परतफेडीसाठी एफडीवर कर्ज घ्यावे का?, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

पेन्शनर्ससाठी काउंटडाउन: ‘हे’ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अवघे 15 दिवस!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें