LIC Scheme : रोज 259 रुपये तुमच्या मुलाला करतील लखपती! या योजनेत गुंतवा रक्कम

LIC Scheme : एलआयसीच्या अनेक योजना आहे. त्यापैकी मुलांना लखपती करणाऱ्या या योजनेची सध्या चर्चा सुरु आहे, ही योजना तरी कोणती..

LIC Scheme : रोज 259 रुपये तुमच्या मुलाला करतील लखपती! या योजनेत गुंतवा रक्कम
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 6:18 PM

नवी दिल्ली : देशात भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Of India) ही सरकारची विमा कंपनी सर्वात लोकप्रिय आहे. विमा कंपन्यांमध्ये एलआयसीचा सर्वाधिक वाटा आहे. कोणत्याही कंपनीकडे बाजारातील एवढा मोठा वाटा नाही. आजही अथवा बचत म्हटलं की सर्वसामान्य नागरिक अगोदर एलआयसीचा विचार करतो. एलआयसीवर लाखो भारतीयांचा मोठा विश्वास आहे. एलआयसीच्या अनेक योजना बाजारात लोकप्रिय आहेत. त्यात अनेकांनी गुंतवणूक सुद्धा केलेली आहे. त्यापैकी मुलांना लखपती (Lakhpati Scheme) करणाऱ्या या योजनेची सध्या चर्चा सुरु आहे, ही योजना तरी कोणती..

जीवन तरुण योजना एलआयसीने गुंतवणूकदारांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी जीवन तरुण योजना आणली आहे. ही योजना खास आहे. या योजनेत मुलांच्या नावे रोज 259 रुपये गुंतवल्यास तुमचं मुलं वयात आल्याबरोबर लखपती होईल. त्याला नोकरी शोधेपर्यंत अथवा व्यवसायाचं गणित जमवेपर्यंत भलीमोठी रक्कम गाठीशी राहील. ही रक्कम त्याला स्वप्न साकारण्यासाठी उपयोगी ठरेल.

योजनेची वैशिष्ट्ये काय जीवन तरुण योजना ही विम्यासह बचत योजना आहे. ही पॉलसी एक नॉन लिंक्ड पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक विमा योजना आहे. या योजनेत विम्याचे संरक्षण आणि बचत या दोन्ही सुविधा मिळतात. भविष्यातील मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी आई-वडील आतापासूनच गुंतवणूक करता येते. एलआयसीच्या या योजनेत गुंतवणुकीसाठी मुलाचं वय कमीत कमी 90 दिवसांचं असायला हवं. 12 वर्षांवरील मुलांना या योजनेत सहभागी होता येत नाही.

हे सुद्धा वाचा

किती वर्ष भरणार हप्ता जीवन तरुण पॉलिसी नुसार, मुलांचं वय 20 वर्ष होईपर्यंत आई-वडिलांना या योजनेचा हप्ता जमा करावं लागेल. तुमचा मुलगा-मुलगी 25 वर्षांचे झाले की, या योजनेतंर्गत कमीत कमी 75,000 रुपयांचं सम एश्योर्ड रक्कम मिळते. तर जास्तीत जास्त रक्कम किती पण असू शकते.

हप्ता कसा भरणार कोणत्याही ग्राहकाला वार्षिक, सहामाही, त्रैमासिक, मासिक या आधारावर प्रीमियम भरता येईल. एलआयसीने मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ही पॉलिसी तयार केली आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने ही अत्यंत जोरदार योजना आहे. त्याचा ग्राहकांना भविष्यात मोठा लाभ होतो.

असे जमवा 11 लाख जर तुम्ही या योजनेत तुमच्या मुलांच्या नावे रोज 259 रुपये गुंतवाल. तर वार्षिक तुम्ही 93,351 रुपये जमा कराल. आठ वर्षांत तुम्ही एकूण 7.32,738 रुपये जमा कराल. या गुंतवणूक रक्कमेवर तुम्हाला 3,70,500 रुपयांचा बोनस मिळेल. म्हणजे वयाच्या 25 व्या वर्षी तुमच्या मुलाच्या नावे 11 लाख रुपये जमा असतील.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.