Aadhaar Card Update | तुमचे आधारकार्ड 10 वर्षे जुने झाले असेल तर या तारखेपर्यंत फ्रि अपडेट करता येणार

| Updated on: Mar 13, 2024 | 7:44 PM

Aadhaar Card Update Deadline Extended : केंद्र सरकारने 10 वर्षे जुन्या झालेल्या Aadhaar card संबंधी मोठी घोषणा केली आहे, आता तुम्ही या तारखेपर्यंत संपूर्ण मोफत आधारकार्ड अपडेट करू शकणार आहात. आधारकार्ड हल्ली महत्वाचे सरकारी डॉक्युमेंट बनले आहे. तुम्हाला सिमकार्ड खरेदी पासून ते घर खरेदी किंवा भाड्याने देणे, नोकरी तसेच बॅंकेत खाते उघडणे आणि महत्वाचे म्हणजे सरकारी कामासाठी ते अत्यंत गरजेचे आहे.

Aadhaar Card Update | तुमचे आधारकार्ड 10 वर्षे जुने झाले असेल तर या तारखेपर्यंत फ्रि अपडेट करता येणार
Aadhaar card
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 13 मार्च 2024 : जर तुमच्या आधारकार्डला ( Aadhaar Card Update ) दहा वर्षे पूर्ण झाले असेल आणि तुम्ही त्यास अपडेट केले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सरकारने आता आधारकार्डला अपडेट करण्यासाठी देशातील कोट्यवधी नागरिकांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता आधारकार्ड मोफत अपडेट करण्याच्या सुविधेला आता 14 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी फ्रिमध्ये आधारकार्ड अपडेट करण्याची तारीख 14 मार्चपर्यंत होती. आता ही तारीख थेट 14 जूनपर्यंत वाढविल्याने आधारधारकांना आता आपले आयडेंटीटी आणि अॅड्रेस प्रुफ अपलोड करुन ते अपडेट करण्यासाठी चार महिन्यांचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे. त्यामुळे तुमच्या आधारकार्डला जर दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर नजिकच्या केंद्रात जाऊन तातडीने ते अपडेट करून घ्या.

जर तुम्ही तुमचे आधारकार्ड वेळेत अपडेट केले नाही तर तुमची आधारकार्डशी संलग्न महत्त्वाची कामे रखडू शकतात. एवढेच नाही तर आधारकार्डमधील चुकीच्या माहितीमुळे तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ देखील मिळणार नाही. परंतू आता आधारकार्ड अपडेट करण्यास मुदतवाढ मिळाल्याने तुम्हाला आता काळजी करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही myAadhaar पोर्टलला भेट देऊन आधार डेमोग्राफीक अपडेट करू शकता. ही सेवा संपूर्णपणे मोफत असून ती केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे.

आधार नोंदणी केंद्रावरही सुविधा

तुम्हाला जर आधार केंद्रावर जाऊन तुमची माहीती अपडेट करायची असेल तर तुम्हाला 50 रुपये फि भरुन हे काम करावे लागेल. आधारकार्ड सर्व ठिकाणी गरजेचे सरकारी डॉक्युमेंट झाले आहे. तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनेसाठी आधारकार्ड अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला ते वेळेत अपडेट करणे गरजेचे आहे. घर खरेदीपासून ते फिक्स्ड डिपॉझिट्स, म्यूचुअल फंड आदीत गुंतवणूक करण्यापासून ते ड्रायव्हींग लायसन्स पासून सर्व सरकारी डॉक्युमेंटसाठी आधारकार्ड गरजेचे आहे. त्यामुळे ते अपडेट करण्यातच तुमचा फायदा आहे.

या वेबसाईटवर अधिक माहीती

यूआयडीएआयने 10 वर्षांहून अधिक जुने आधारकार्ड वापरणाऱ्या लोकांना त्यांची सर्व माहीती नव्याने अपडेट करण्यास सांगितले आहे. तुम्हाला सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी ही माहीती अपडेट करणे गरजेचे आहे. तुम्ही आजच myaadhaar.uidai.gov.in वर जाऊन यासंबंधीची अधिक माहीती मिळवू शकता.