पुढच्या महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी, पगार आणि पाच दिवसांचा आठवड्यावर होऊ शकतो निर्णय
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच बॅंक कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी पगार वाढ होणार आहे. तसेच बॅंक कर्मचाऱ्यांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता विकेण्ड बॅंकेतील कामे करण्यात अडचणी येणार आहेत.
मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या कर्मचाऱ्यांना सुखाचे दिवस येणार आहेत. या कर्मचाऱ्यांना 15 ते 20 पगार वाढ होणार आहे. शिवाय त्यांच्यासाठी पाच दिवसाचा आठवडा करण्याची योजना आहे. हा पाच दिवसांचा आठवड्याचा निर्णय येत्या डिसेंबरच्या मध्यापर्यंत लागू होण्याची शक्यता आहे. बॅंक कर्मचारी संघटना तसेच युनियन आणि भारतीय बॅंक संघाच्या ( IBA ) दरम्यान 12 वी द्विपक्षीय करार बैठक अंतिम टप्प्यात असून त्यामुळे लवकरच बॅंक कर्मचाऱ्या गूड न्यूज मिळू शकते असे म्हटले जात आहे.
बॅंक कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा प्रस्ताव प्रथमच ( वेतनवाढीसाठी ) 15 टक्क्यांनी सुरु झाला आहे. ही वेतन वाढ शक्यतो 15 ते 20 टक्क्यांदरम्यान असणार आहे. बॅंक कर्मचाऱ्यांचा कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करण्याची घोषणा वेतन वाढीच्या अधिसूचनेसोबतच वा नंतर भारतीय बॅंक संघाद्वारे होऊ शकते असे या संदर्भात मिडीयात आलेल्या बातम्यांमध्ये म्हटले आहे. बॅंक कर्मचाऱ्यांचा सध्याचा वेतन सामंजस्य करार 1 नोव्हेंबर 2022 रोजी संपला आहे. तेव्हापासून भारतीय बॅंक संघ ( IBA ) आणि बॅंक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या युनियननी नवीन वेतन सामंजस्य करारासाठी बोलणी सुरु आहेत. याशिवाय वेतन सुधारणा आणि पाच दिवसांचा आठवडाचा निर्णय ग्रामीण क्षेत्रातील बॅंकांनाही लागू होणार आहे.
पाच दिवसांचा आठवडा
एकदा का पाच दिवसांचा आठवडा सुरु झाला की आठवड्याच्या अखेर विकेण्ड बॅंकेच्या शाखा बंद रहातील. परंतू कामातील तासांचे नुकसान भरुन काढण्यासाठी कर्मचाऱ्या आठवड्यातील दिवसात जादा तास काम करुन ही भरपाई करावी लागेल. त्यामुळे आता सध्याच्या कामकाजापेक्षा बॅंक कर्मचाऱ्यांना 30 ते 45 मिनिटे जादा काम करावे लागेल. बॅंकेच्या ग्राहकांना ज्यांना कॅश काढायची आहे. किंवा कॅश ट्रान्सफर करायची आहे. त्यांना ही कामे स्वयंचलित मशिनच्या सहाय्याने करावी लागतील. परंतू चेक जमा करण्याचे काम मात्र या पाच दिवसाच्या आठवड्यामुळे विकेण्डला होणार नाही.