AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! रेल्वे स्टेशनवरचा तो टॉयलेट वापरला, तर GST सह 112 रुपये आकारले जातील

शौचालय वापरासाठी आकारलेल्या शुल्कात  6 टक्के जीएसटी आणि 6 टक्के सी जीएसटी समाविष्ट आहे. म्हणजेच शौचाला जाण्यासाठी 12 टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. आतापर्यंतची ही पहिलीच घटना आहे

सावधान! रेल्वे स्टेशनवरचा तो टॉयलेट वापरला, तर GST सह 112 रुपये आकारले जातील
आग्रा स्टेशन Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 05, 2022 | 7:22 AM
Share

प्रवासादरम्यान तुम्ही अनेकदा रेल्वे स्टेशन (Indian Railway) किंवा बस स्टँडच्या शौचालयाचा (Washroom) वापर केला असेल आणि त्यासाठी तुम्ही 5 ते 10 रुपये शुल्क देखील आकारले गेले असतील असतील. मात्र भारतातल्या एका रेल्वे स्थानकावर शौचालय वापरण्यासाठी चक्क 112 रुपये शुल्क (Charge 112 rupees) आकारले जाते. आग्रा कॅंट स्टेशनवरील (Agra cantt station) एक्झिक्युटिव्ह लाउंजचे शौचालय काही मिनिटांसाठी वापरण्याच्या बदल्यात, ब्रिटीश दूतावास नवी दिल्ली येथून आलेल्या दोन पर्यटकांना 112-112 म्हणजेच 224 रुपये मोजावे लागले. मुख्य म्हणजे या शुल्कात जीएसटीचा देखील समावेश आहे.

किती टक्के आकारला जातो जीएसटी?

शौचालय वापरासाठी आकारलेल्या शुल्कात  6 टक्के जीएसटी आणि 6 टक्के सी जीएसटी समाविष्ट आहे. म्हणजेच शौचाला जाण्यासाठी 12 टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे. आतापर्यंतची ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये शौचालयात जाणे देखील एखाद्यासाठी इतके महागडे ठरले.

 IRCTC चे काय म्हणणे आहे?

शौचालय वापरण्यासाठी पर्यटकांकडून आकारलेल्या या शुल्काचे  प्रकरण लाउंज व्यवस्थापकापर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांनी यात  आयआरसीटीसीचा कोणताही दोष नसल्याचे सांगितले. हे विश्रामगृह एक्झिक्युटिव्ह आहे. एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये राहण्यासाठी 50 टक्के सूट दिल्यानंतर किमान 112 रुपये शुल्क भरणे बंधनकारक आहे. IRCTC नुसार, पैसे भरल्यानंतर तुम्हाला  मोफत कॉफी दिली जाते. यामध्ये प्रवाशाला शौचालयाचा वापर, मोफत वायफाय आणि एसी एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये 2 तासांपर्यंत थांबण्याची व्यवस्था आहे.

याआधीही समोर आले होते सर्व्हिस चार्जशी संबंधित प्रकरण

सेवा शुल्कामुळे चर्चेत येण्याचे हे IRCTC चे पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वी भोपाळ शताब्दी ट्रेनमध्ये एका व्यक्तीकडून 20 रुपयांच्या कपवर 50 रुपये सर्व्हिस चार्ज घेतला होता. त्या व्यक्तीला एका कप चहासाठी 70 रुपये मोजावे लागले. रेल्वेच्या या ‘हायफाय’ सेवेचा पुरावा म्हणून त्या व्यक्तीने चहाचे बिल सोशल मीडियावर शेअर केले होते, त्यानंतर रेल्वेला स्पष्टीकरण म्हणून आपली बाजू मांडावी लागली होती.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.