Investment advice : पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे; मिळवा दहा वर्षांत डबल, पैसाही राहिल पूर्ण सुरक्षित

तुम्हाला जर कोणतीही जोखीम न घेता सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्यासाठी पोस्टाच्या विविध बचत योजना एक चांगाला पर्याय ठरू शकतात. अशाच एका योजनेबद्दल आज आपण जाणूण घेणार आहोत.

Investment advice : पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा पैसे; मिळवा दहा वर्षांत डबल, पैसाही राहिल पूर्ण सुरक्षित
Image Credit source: TV9
अजय देशपांडे

|

Jun 05, 2022 | 11:10 AM

मुंबई : जर तुम्ही कोणत्याही जोखमीशिवाय अधिक परतावा मिळेल अशा योजनांमध्ये गुंतवणूक (Investment) करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी पोस्टाच्या विविध सेविंग्स स्कींम्स (Saving Schemes) एक उत्तम पर्याय आहे. पोस्टांच्या बचत योजनांचे वैशिष्ट म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्यास तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित तर राहातोच सोबतच तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. समजा तुम्ही एखाद्या बँकेत एफडीमध्ये किंवा अन्य एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवले आणि जर त्या बँकेचे दिवाळे निघाले तर तुम्हाला सरकारी नियमाप्रमाणे फक्त पाच लाख रुपयांपर्यंतचीच रक्कम वापस मिळते. मात्र पोस्टांच्या योजनांचे तसे नसते. पोस्टाच्या योजनामध्ये गुंतवलेला पैसा हा पूर्णपणे सुरक्षित असतो. तुम्ही जेवढा पैसा गुंतवता ते पैसे तुम्हाला त्या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर व्याजासह मिळतात. त्यामुळे पोस्टामधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. आज आपण पोस्टाच्या अशाच एका योजनेची माहिती घेणार आहोत. ज्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एक चांगला परतावा मिळू शकतो. किसान विकास पत्र (KVP) असे या योजनेचे नाव आहे.

व्याज दर

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र स्कीममध्ये केलेल्या गुंतवणुकीवर सध्या 6.9 टक्के व्याज दर दिला जात आहे. हे व्याज वार्षीक आधारावर दिले जाते. दिनांक एक एप्रिल 2020 पासून किसान विकास पत्र स्कीममधील गुंतवणुकीवर 6.9 टक्के दराने व्याज देण्यात येते, गेल्या दोन वर्षांत व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या योजनेत तुम्ही केलेली गुंतवणूक 124 महिने म्हणजे दहा वर्षांत दुप्पट होते.

किती गुंतवणूक करता येते

किसान विकास पत्र या योजनेमध्ये तुम्ही शंभरच्या पटीत कितीही गुंतवणूक करू शकता. योजनेत किती रक्कम गुंतवावी याला काही मर्यादा नाही. तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकता.

खाते कोणाला ओपन करता येते

या योजनेमध्ये कोणत्याही प्रौढ भारतीय नागरिकाला खाते ओपन करता येते. दोन किंवा तीन व्यक्ती मिळून जॉइंट खाते देखील काढू शकता. जे मुलं अल्पवयीन आहेत त्यांचे पालक आपल्या मुलाच्या नावाने खाते ओपन करू शकतात. तसेच ज्या मुलांचे वय हे दहा वर्षांपेक्षा अधिक आहे ते आपले खाते स्वता: ओपन करु शकतात. या योजनेच्या मॅच्योरिटीचा कालावधी हा वित्तमंत्रालयाकडून निश्चित केला जातो. त्या तारखेला किंवा त्या कालावधिनंतर तुम्हाला या योजनेचा परतावा मिळू शकतो. परताव्यानंतर तुमच्या हातात एक चांगली रक्कम जमा होते त्यानंतर ती रक्कम तुम्ही दुसऱ्या एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवू शकता.

हे सुद्धा वाचा

टीप : टीव्ही 9 मराठी कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही. ही बातमी केवळ माहितीच्या उद्देशाने दिली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें