AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI repo rate : कर्ज आणखी महाग होणार; पुढील आठवड्यात आरबीआयकडून पुन्हा रेप रेटमध्ये वाढ?

भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे. रेपो रेट वाढवल्यास कर्ज महाग होऊन ईएमआयमध्ये वाढ होईल.

RBI repo rate : कर्ज आणखी महाग होणार; पुढील आठवड्यात आरबीआयकडून पुन्हा रेप रेटमध्ये वाढ?
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 05, 2022 | 6:47 AM
Share

नवी दिल्ली : देशात सध्या महागाई (Inflation) सर्वोच्च स्थरावर पोहोचली आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत (vegetables) आणि पेट्रोल, डिझेलपासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तुंचे भाव वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडले मोडले आहे. देशात महागाई हा कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे आता देशात वाढत असलेली महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून काही पाऊले उचलण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तुमच्या ईएमआयमध्ये (EMI) वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा रेपो रेटध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. आरबीआयने गेल्याच महिन्यात रेपो रेटमध्ये 40 बेसीस पॉईंटची वाढ केली आहे. पुन्हा एकदा रेपोरेट वाढवण्यास त्याचा थेट परिणाम हा ईएमआय वाढीवर होणार आहे. मात्र काही तज्ज्ञांच्या मते केवळ रेपो रेटमध्ये वाढ करून महागाईचा प्रश्न सुटणार नाही, कारण ही महागाई मुबलक चलनामुळे आलेली नसून, वस्तुंच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेली आहे.

0.40 टक्के रेपो रेट वाढवण्याची शक्यता

आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक येत्या सहा ते नऊ जूनदरम्यान होणार आहे. गेल्या वेळेस एप्रिल महिन्यात बैठक झाली होती. या बैठकीत रेपो रेटबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच आरबीआयने एमपीसीची अपातकालीन बैठक बोलावून अचानक रेपो रेटमध्ये 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मिळत असलेल्या माहितीनुसार येत्या सहा ते नऊ जूनदरम्यान होणाऱ्या बैठकीमध्ये पुन्हा एकाद आरबीआय रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. यावेळी देखील रेपो रेटमध्ये 0.40 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

टोमॅटोने वाढवली महागाई

बोफा सिक्योरिटीजने म्हटले आहे की, सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे भाव वाढल्याने मेमध्ये महागाई वाढली. मुख्य महागाई 7.1 टक्क्यांवर पोहोचली आहे. अशा स्थितीमध्ये आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ जवळपास निश्चित आहे. गेल्या काही दिवसांत महागाईपासून सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्राकडून काही पाऊल उचण्यात आली आहेत. त्यातील महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात केली आहे. अबकारी करात कपात झाल्याने पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर सात रुपयांनी स्वस्त झाले. इंधनाच्या किमती काहीप्रमाणात कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. तसेच खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय देखील केंद्राकडून घेण्यात आला आहे.

रेपो रेट वाढीनंतर बँकांकडून व्याज दरात वाढ

दरम्यान गेल्या मे महिन्यात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 40 बेसीसी पॉईंटची वाढ करण्यात आली होती. आरबीआयने रेपो रेट वाढवताच बँकांनी आपल्या विविध कर्जाच्या व्याज दरात वाढ करण्याचा सपाटाच लावला आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि इतर सर्वच प्रकारचे कर्ज महाग झाले आहेत. ईएमआयमध्ये देखील वाढ झाली आहे. आयसीआयसीआय बँक, पीएनबी बँक, एचडीएफसी बँक अशा जवळपास सर्वच प्रमुख बँकांकडून व्याज दर वाढवण्यात आले आहेत.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....