AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Investment : धनत्रयोदशीला सोन्यातच गुंतवणूक कशाला, हे गोल्डन पर्याय ही आहेत की..

Investment : या दिवाळीत गुंतवणूक करा जरा हटके, हे आहेत गोल्डन पर्याय..

Investment : धनत्रयोदशीला सोन्यातच गुंतवणूक कशाला, हे गोल्डन पर्याय ही आहेत की..
गुंतवणुकीचे हटके पर्यायImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 22, 2022 | 2:41 PM
Share

नवी दिल्ली : भारतात दिवाळी (Diwali) आणि धनत्रयोदशीला (Dhanteras) सर्वाधिक सोने आणि चांदीची (Gold-Silver)खरेदी करण्यात येते. यामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानण्यात येते. परिणामी सणासुदीच्या काळात भारतीय सर्वाधिक गुंतवणूक सोने आणि चांदीतच करतात. पण यापेक्षाही हटके पर्याय तुम्ही निवडू शकता. काही आहेत हे पर्याय, पाहुयात..

चांगल्या परताव्यासाठी(Good Returns) तुम्हाला थोडी रिस्क घ्यावी लागेल. पण एखाद्यावेळी तुमची बंपर लॉटरी लागली तर जोखीमेची उरली सुरली कसर भरून निघते. तेव्हा हे पर्याय तुमच्या डोळ्यासमोर आहेत, पण जोखीम असल्याने तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर या दिवाळीत हा बुजरेपणा एकदा सोडा आणि गुंतवणूक करा.

शेअर बाजारात (Share Market) कमी कालावधीत चांगला परतावा मिळविता येतो. तर दीर्घकाळासाठी यामध्ये गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरते. चांगला आर्थिक सल्लागार आणि तुम्ही थोडी अभ्यासाची सवय लावून घेतली तर कमाई होऊ शकते.

शेअर बाजार हा एक जुगार आहे, हे पहिल्यांदा डोक्यातून काढा. चांगल्या कंपन्यांची यादी तयार करा. शेअर बाजारात दर महिन्याला सिस्टिमॅटिक इन्व्हेसमेंट प्लॅन अर्थात एसआयपी(SIP) प्रमाणेही गुंतवणूक करता येते. जोखीम असली तर फायदा ही असतो.

Debt Mutual Fund हा तुमच्या पोर्टफोलियोत जोखीम आणि परताव्यात एकदम जबरदस्त संतूलन राखतो. जर तुम्ही एका निश्चित कालावधीसाठी स्थिर परताव्याच्या शोधात असाल तर यामध्ये गुंतवणूक करु शकता.

याशिवाय तुमची निवृत्ती जवळ आली असेल तर कमी जोखीम असलेल्या Debt Mutual Fund तुमच्या दिमतीला आहेच. या फंडमध्ये या दिवाळीत गुंतवणूक करुन सोन्यासारखा परतावा मिळवू शकता.

पारंपारिक गुंतवणुकीचा आणखी एक पर्याय तुमच्यासमोर आहे. सुरक्षित आणि हमीचा हा मार्ग म्हणजे मुदत ठेव योजनेत (FD) गुंतवणूक करणे हा होय. FD मध्ये गुंतवणूक करणे जोखीमचं नाही. हा पण यामध्ये सध्या कमी व्याजदर मिळत असल्याने परतावा म्हणावा तितका मिळत नसला तरी दिवाळीत गुंतवणुकीसाठी हा पर्याय चांगला ठरु शकतो.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.