Aadhaar Card : आधार कार्डचा गैरवापर होत आहे? तर UIDAI कडे करा बिनधास्त तक्रार..

Aadhaar Card : आधार कार्डचा गैरवापर होत असेल तर याठिकाणी तुम्ही तक्रार करु शकता..

Aadhaar Card : आधार कार्डचा गैरवापर होत आहे? तर UIDAI कडे करा बिनधास्त तक्रार..
येथे करा तक्रारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 10:51 PM

नवी दिल्ली : डिजिटल भारताकडे (Digital Bharat) आपण अतिवेगाने धाव घेत आहोत. तशी सायबर फ्रॉडकडे (Cyber Fraud) आपली वाटचाल ही सुरु आहे. सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी अनेक उपाय करण्यात येत आहे. पण आधार कार्ड (Aadhaar Card) फसवणुकीच्या घटना कमी झालेल्या नाही. अनेक वेळा फसवणूक होते. तेव्हा या ठिकाणी तुम्हाला तक्रार करता येते..

आधार कार्डची संस्था, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांना सतर्क केले आहे. UIDAI नागरिकांसाठी एक फोन नंबर आणि ई-मेल आयडी शेअर केला आहे. हा नंबर कोणता आहे, ई-मेल आयडी कोणता आहे, हे समजून घेऊयात..

UIDAI ने ट्विट करुन या टोल फ्री नंबर आणि ई-मेल आयडीची माहिती दिली आहे. त्यानुसार, फसवणूक प्रकरणात नागरिकांना अथवा त्यांना आधार कार्डचा गैरवापर होत असल्याची शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

हे सुद्धा वाचा

नागरिकांना टोल फ्री नंबर- 1947 वर कॉल करता येईल. नागरिकांना ही सेवा 24×7 उपलब्ध आहे. याशिवाय फसवणूक झाल्यास अथवा गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्यास, help@uidai.gov.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

आधारच्या गैरवापराशिवाय तु्म्हाला आधार कार्डविषयी कोणताही प्रश्न असेल अथवा काही शंका असतील तर तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर विचारु शकता वा ई-मेलवर संपर्क साधू शकता.

UIDAI ने सर्व नागरिकांचे आधार कार्ड दर 10 वर्षांनी अद्ययावत (Update) करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दर 10 वर्षांनी नागरिकांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहे.

आधार कार्ड अपडेट केल्यामुळे बोगस आधार कार्डला आळा बसेल असा विश्वास UIDAI ला आहे. यासंबंधीची अधिसूचना प्राधिकरणाने काढली आहे. प्रत्येक नागरिक आता दहा वर्षांनी त्याची बायोमॅट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती अद्ययावत करु शकतो, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.